Winter Health Tips Food For Strong Immunity Marathi News

Winter Healthy Food List : हिवाळ्यात आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, हवामानातील बदलामुळे अनेक आजारांना सुरुवात होते. विशेषत: ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती (Immunity System) कमी असते त्यांना हिवाळ्यात त्रास होतो. अशा परिस्थितीत रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी काही हंगामी पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणारी आणि शरीराला उबदार ठेवण्यासाठी मदत करणारे खाद्यपदार्थ कोणते असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर या ठिकाणी आम्ही या संदर्भात तुम्हाला माहिती सांगणार आहोत.    

1. तूप : तुपामुळे कॅलरीज वाढतील असा विचार तुम्ही करत असाल, पण कमी प्रमाणात सेवन केल्यास ते खराब चरबी कमी करते आणि तुमचे शरीर उबदार ठेवण्यासही मदत करते.

2. गूळ : गूळ केवळ तुमची पचनक्रिया सुधारत नाही तर तुमचे शरीर उबदार ठेवण्यास तुम्हाला मदत करतं.

News Reels

  

3. गरम सूप : थंडीत स्वतःला झटपट उबदार करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. तसेच, सूप प्यायल्याने सर्दी किंवा घसा खवखवण्यापासून त्वरित आराम मिळतो. 

4. सुका मेवा : हिवाळ्यात ड्रायफ्रूट्सचा देखील शरीर उबदार ठेवण्यासाठी वापर केला जातो. जर्दाळू, अंजीर आणि खजूर नैसर्गिकरित्या शरीराला उबदार करतात.

5. केशर : जर तुम्हाला तुमचे शरीर उबदार ठेवायचे असेल तर दुधात केशर घालून तुम्ही हे दूध पिऊ शकता. ही एक अतिशय फायदेशीर कृती आहे.

6. दालचिनी : दालचिनी शरीरातील चयापचय वाढवते. दालचिनीचे सेवन थंड हवामानात शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी मदत करते. 

7. तीळ : तुम्हाला श्वसनाशी संबंधित काही समस्या असतील तर ती तीळ दूर ठेवण्यास मदत करू शकतात. 

8. तुळशी आणि आलं : तुळशी आणि आल्यामध्ये अँटीबैक्टीरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात. जे सर्दी आणि खोकला न होण्यासाठी उपयुक्त ठरतात. तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात या चहाने करा. तुम्हाला फ्रेश वाटेल. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

Best Tea For Winter : हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी ‘या’ खास चहाचा वापर करा; काही दिवसांतच फरक दिसेल


Source link

Check Also

Health Tips | Health Tips : चांगल्या दृष्टीपासून ते निरोगी त्वचेपर्यंत असे आहेत ब्रोकोलीचे फायदे

ब्रोकोलीमध्ये बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन ए, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन सी आणि ई भरपूर प्रमाणात …

Health Tips : थायरॉइड झाल्यावर चहाचं सेवन करावं की करू नये?

Health Tips : थायरॉइड झाल्यावर चहाचं सेवन करावं की करू नये? Source link

Health Tips Swollen Legs Feet Ankle Symptoms Marathi News

Swollen Legs Reasons : गुडघ्याच्या खाली तुमच्या पायाला सतत सूज येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published.