When, Where To Watch India Tour Of New Zealand Match IND Vs NZ 1st ODI Know Details

India vs New Zealand Match Live Streaming : भारतीय क्रिकेट संघ (Team India) सद्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात प्रत्येकी तीन टी-20 आणि एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. यातील टी20 मालिकेत भारतानं एक सामना जिंकला असून दोन सामने अनिर्णीत राहिल्याने मालिका भारताने जिंकली. ज्यानंतर आजपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. 

शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) आजपासून अर्थात 25 नोव्हेंबरपासून एकदिवसीय मालिकेला (IND vs NZ ODI Series) सुरुवात करणार आहे. या सामन्याद्वारे भारत 2023 मध्ये खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठीचा (ODI World Cup 2023) सराव सुरु करेल.  या 50 षटकांच्या विश्वचषकासाठी भारत अधिकाधिक वन डे खेळणार आहे. ज्याची सुरुवात आजपासून होत आहे. तर आज होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्याबद्दलची माहिती जाणून घेऊ…

कधी होणार सामना?

भारतीय वेळेनुसार आजचा भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना सकाळी 7 वाजता खेळवला जाईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे. 

News Reels

कुठे आहे सामना?

आजचा हा भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिला एकदिवसीय सामना टी20 सामना ऑकलँड एडन पार्क क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.  

कुठे पाहता येणार सामना?

या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर होणार आहे. तसेच अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील. 

वन डे मालिकेसाठी कसा आहे भारतीय संघ?

शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, शहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, दीपक चाहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक:







सामना तारीख ठिकाण
पहिला एकदिवसीय सामना 25 नोव्हेंबर ऑकलँड
दुसरा एकदिवसीय सामना 27 नोव्हेंबर हेमिल्टन
तिसरा एकदिवसीय सामना 30 नोव्हेंबर क्राइस्टचर्च

हे देखील वाचा-


Source link

Check Also

Team India Lost Odi Series Against Bangladesh After Loosing 2nd Odi First Time Lost Series Against Bangladesh After 2015

India vs Bangladesh 2022 : भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN) यांच्यात सुरु एकदिवसीय मालिकेतील …

PAK Vs ENG GUNSHOTS Heard 1 Km Near England Team Hotel In Multan Fans Say A Normal Day In Pakistan

PAK vs ENG: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यामधील तीन कसोटी सामन्यातील दुसरा सामना शुक्रवारी ( 9 …

ICC Player Of The Month Award Womens Category Nominations Shared By ICC With Wrong Posters

ICC Player Of the Month : आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात आयसीसीने (ICC) 6 डिसेंबर रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published.