Water Tank Line Design Facts Know Why Water Tanks Has Lines Between Tanks Marathi News

Water Tank Line Design : आपण दररोज अशा अनेक गोष्टी पाहतो, ज्यांच्या डिझाइनमध्ये काहीतरी विशेष असतं. मात्र, त्यामागचं लॉजिक अनेकदा आपल्याला कळत नाही. खरंतर, अनेक गोष्टींच्या रचनेत काही लॉजिक असते, ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो, पण विज्ञानानुसार त्या खूप महत्त्वाच्या असतात. याचं उदाहरण म्हणजे छतावर ठेवलेली पाण्याची टाकी. तुम्ही पाण्याची टाकी अनेकवेळा पाहिली असेल, पण ही टाकी सरळ का नाही आणि या टाकीत बनवलेल्या लाईनचं कारण नेमकं काय आहे? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पाण्याच्या टाकीमध्ये या लाईन नेमक्या का केल्या जातात. चला जाणून घेऊयात.   

लाईन का बनवल्या जातात? Why are lines made?

पाण्याच्या टाकीतील लाईन हा एक प्रकारे डिझाईनचाच भाग आहे. पण, हे डिझाईनसुद्धा काही खास विचार करून बनवण्यात आलं आहे. या डिझाईननुसार ते पाणी सुरक्षित ठेवण्यास मदत करते. पाण्याच्या टाकीत बनवलेल्या या लाईन टाकीला भक्कम बनवतात. आणि प्रत्येक सीझनमध्ये पाण्याची टाकी टिकाऊ बनवण्याचे काम करतात. 

उन्हाळ्यात टाकी विस्तारत नाही

news reels New Reels

अनेकदा उन्हाळ्यात प्लास्टिकच्या टाकीचा विस्तार होण्याचा धोका असतो. परंतु, या काळात या रेषा ते मजबूत करण्यासाठी आणि विस्तारण्यापासून रोखण्याचं कार्य करतात. खरंतर, जिथे जिथे या लाईन बनवल्या जातात, त्या ठिकाणांची खास गोष्ट म्हणजे त्या त्या ठिकाणच्या बाजू मजबूत असतात. त्या ठिकाणी मजबूत भाग असल्याने प्लास्टिकची टाकी पसरत नाही.

प्रेशर नियंत्रित करण्यास मदत करते (help to Control Pressure)

जेव्हा तुम्ही टाकीला स्पर्श करता तेव्हा तुम्हाला कळेल की या लाईन कुठे आहेत. तिथे तुम्हाला पाण्याची टाकी मजबूत दिसेल. त्यामुळे पाण्याचा दाब सहन करण्यास मदत होते. एक प्रकारे, ते कोणत्याही निर्मितीमध्ये आधार म्हणून कार्य करते. या कारणामुळे कंपन्या प्लास्टिकच्या टाक्या बनवताना लाईनचा वापर करतात. 

जर प्लास्टिकच्या टाक्यांमध्ये या लाईन राहिल्या नाहीत आणि रचना पूर्णपणे साधी राहिली तर ती टाकी फुगण्याची भीती असते. कारण प्लास्टिक इतका दाब सहन करू शकत नाही. या लाईनच्या विशेष डिझाइनमुळे टाकी मजबूत दिसते आणि  दीर्घकाळ टिकते. 

महत्त्वाच्या बातम्या : 

Biryani: दारुच्या नशेत मुंबईतील तरुणीने मागवली बंगळुरुतून 2500 रुपयांची बिर्याणी, ऑर्डर मिळाल्यानंतर म्हणाली… 


Source link

Check Also

Health Tips | Health Tips : चांगल्या दृष्टीपासून ते निरोगी त्वचेपर्यंत असे आहेत ब्रोकोलीचे फायदे

ब्रोकोलीमध्ये बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन ए, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन सी आणि ई भरपूर प्रमाणात …

Health Tips : थायरॉइड झाल्यावर चहाचं सेवन करावं की करू नये?

Health Tips : थायरॉइड झाल्यावर चहाचं सेवन करावं की करू नये? Source link

Health Tips Swollen Legs Feet Ankle Symptoms Marathi News

Swollen Legs Reasons : गुडघ्याच्या खाली तुमच्या पायाला सतत सूज येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published.