Vikram Vedha Trailer Hype Five Million Views In Five Hours

Vikram Vedha : बहुप्रतिक्षित ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha) हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अल्पावधीतच ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ट्रेलरला पाच तासाच पाच मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. 

‘विक्रम वेधा’च्या ट्रेलरला सोशल मीडियावर उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ‘विक्रम वेधा’ या सिनेमात सैफ अली खान विक्रमच्या भूमिकेत आहे. तर हृतिक रोशन वेधाच्या भूमिकेत दिसणार आहे. हृतिक रोशन आणि सैफ अली खानचा ट्रेलरमधील लुक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 

‘विक्रम वेधा’ या सिनेमात रोहित सराफ, योगिता बिहानी, शरीब हाश्मी आणि सत्यदीप मिश्रा हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा थरार-नाट्यासोबत अॅक्शनचा तडकादेखील पाहायला मिळणार आहे. ट्रेलर रिलीज झाल्याने प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहे. 


30 सप्टेंबरला ‘विक्रम वेधा’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला 

‘विक्रम वेधा’ या सिनेमाची निर्मिती गुलशन कुमार, टी-सिरीज आणि रिलायन्स एंटरटेनमेंट यांच्या सहयोगाने फ्रायडे फिल्मवर्क, जिओ स्टुडिओज आणि वायनॉट स्टुडिओज प्रोडक्शनने केली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केलं आहे.  ‘विक्रम वेधा’ हा सिनेमा 30 सप्टेंबर रोजी संपूर्ण जगभर रिलीज होणार आहे.

संबंधित बातम्या

Vikram Vedha Trailer : अॅक्शन, ड्रामा अन् थ्रील; ‘विक्रम वेधा’ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज!

Vikram Vedha : ‘विक्रम वेधा’चे जबरदस्त पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ दिवशी रिलीज होणार चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर!
Source link

Check Also

Gandhi Jayanti Mahatma Gandhi Birth Anniversary Bollywood Actors Who Played The Gandhi In Films

मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 2 ऑक्टोबर रोजी जयंती. त्यानिमित्ताने देशभर गांधीजींचं स्मरण केलं जातंय. …

PHOTO : बेन किंग्जले ते नसरुद्दीन शाह… या अभिनेत्यांनी साकारले 'गांधी'

PHOTO : बेन किंग्जले ते नसरुद्दीन शाह… या अभिनेत्यांनी साकारले 'गांधी' Source link

Majha Katta Youths Need To Take Initiative To Experiment With Dramas Like Mahanirvan And Begham Barve Said Satish Alekar On Majha Katta

Satish Alekar On Majha Katta : ‘महानिर्वाण’ या लोकप्रिय नाटकाचे वेगवेगळ्या भाषेत प्रयोग होतात. पण …

Leave a Reply

Your email address will not be published.