Umesh Yadav Replaced Mohammed Shami In India Vs Australia T20 Series He Will Play T20 International After 43 Months

IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) मालिकेपूर्वीच अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याला कोरोनाची बाधा झाल्यामुळे तो सामन्यांना मुकणार असल्याचं समोर आलं. दरम्यान शमीच्या जागी उमेश यादव (Umesh Yadav) याला संघात संधी दिल्याचंही बीसीसीआयनं (BCCI) कळवलं. त्यामुळे आता जवळपास 43 महिन्यानंतर उमेश पुन्हा आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळणार आहे. मोहालीमध्ये पहिला सामना होणार असल्याने यादव रविवारी (18 सप्टेंबर) सकाळी 7 च्या सुमारास चंदीगडला पोहोचला आहे. टीम इंडियाचे इतरही खेळाडू पंजाबमध्ये पोहोचले आहेत.

दरम्यान उमेश लवकरात लवकर सामन्याच्या ठिकाणी पोहोचल्याने त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात अंतिम 11 मध्ये संधी मिळेल अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे. असे झाल्यास तो 43 महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये दिसणार आहे. याआधी, तो फेब्रुवारी 2019 मध्ये शेवटचा T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. हा सामनाही त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच खेळला होता.  दुसरीकडे उमेशने आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये शानदार प्रदर्शन केलं. कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना त्याने 7 च्या इकोनॉमी रेटने 14 सामन्यात16 विकेट्स घेतल्या. 

अशी आहे टीम इंडिया-

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, उमेश यादव, दीपक चाहर. 

भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेचं वेळापत्रक-

सामना तारीख ठिकाण
पहिला टी-20 सामना 20/09/2022 ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम
दुसरा टी-20 सामना 23/09/2022 विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, महाराष्ट्र
तिसरा टी-20 सामना 25/09/2022 राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदान, हैदराबाद

हे देखील वाचा- 


Source link

Check Also

3rd T20I: SA win inconsequential match; India unflustered in loss

The third umpire wanted confirmation when Tristan Stubbs’s low grab off Suryakumar Yadav – plucked …

IND Vs SA 3rd T20 Match Highlights South Africa Won By 49 Runs Against India Holkar Stadium Dinesh Karthik 46 Runs Off 21

IND vs SA 3rd T20:  रिले रोसो (Rilee Rossouw)- क्विंटन डी कॉकच्या (Quinton de Kock) …

Watch: Mohammed Siraj on the receiving end of Deepak Chahar’s tirade after error leads to six

Mohammed Siraj was on the receiving end of a tirade from bowler Deepak Chahar when …

Leave a Reply

Your email address will not be published.