Trail Of An Assassin Web Series On Rajiv Gandhi Assassination To Be Directed By Nagesh Kukunoor

Web series on Rajiv Gandhi : राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या हत्येमागील षडयंत्रावर लवकरच एक वेब सीरिज येणार आहे. अप्लॉज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली या वेबसीरिजची निर्मिती करण्यात आली आहे. ‘नाइनटी डेज : द ट्रू स्टोरी ऑफ द हंट फॉर राजीव गांधीज असैसिन’ (Ninety Days: The True Story of the Hunt for Rajiv Gandhi’s Assassins) या पुस्तकावर आधारित ही वेब सीरिज असणार आहे. ‘ट्रेल ऑफ अॅन असॅसिन’ (Trail Of An Assasin) असं या वेबसीरिजचं नाव आहे. 

नागेश कुकुनूर ‘ट्रेल ऑफ अॅन असॅसिन’ या वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राजीव गांधी यांच्या हत्येमागील षडयंत्रावर भाष्य करणारा ‘मद्रास कॅफे’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. शुजित सरकारने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. तर जॉन अब्राहम या सिनेमात मुख्य भूमिकेत होता. या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे आता प्रेक्षक वेब सीरिजची प्रतीक्षा करत आहेत. 

‘नाइनटी डेज: द ट्रू स्टोरी ऑफ द हंट फॉर राजीव गांधीज असैसिन’ हे पुस्तक पत्रकार अनिरुद्ध मित्राने लिहिलेलं आहे. त्याकाळी सर्व प्रकपणाचं अनिरुद्धने रिपोर्टिंग केलं होतं. त्याच तथ्यांच्या आधारावर नंतर त्यांनी हे पुस्तक लिहिलं. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या सीरिजमध्ये सीबीआयकडून हत्याकांडाची कशाप्रकारे चौकशी करण्यात आली, यामागे कोणाचा हात होता अशा अनेक गोष्टींवर भाष्य करण्यात आले आहे. 

नागेश कुकुनर या वेबसीरिजचं दिग्दर्शन करत असून त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी ‘इकबाल’ सारखे सिनेमे तर ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ सारख्या वेबसीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. या वेबसीरिजमध्ये प्रिया बापट, अतुल कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर महत्त्वाच्या भूमिकेत होते.

संबंधित बातम्या

Tejas : पंगाक्वीनचे चाहते नाराज; कंगना रनौतच्या ‘तेजस’ ची रिलीज डेट पुढे ढकलली

Alia Bhatt Instagram : आलियानं दीपिका-कतरिनाला टाकलं मागे; इंस्टाग्रामवर पार केला 70 मिलियनचा टप्पा
Source link

Check Also

Prabhas Saif Ali Khan And Kriti Sanon Starrer Adipurush First Poster Out

Adipurush Poster Out: साऊथचा सुपरस्टार प्रभासच्या (Prabhas) बहुप्रतीक्षित ‘आदिपुरुष’ (Adipurush) या चित्रपटाचे पहिले अधिकृत पोस्टर …

Turkish Melek Mosso Cut Her Hair For Iran Hijab Row Support Video Viral

Iran Hijab Protest: इराणमधील (Iran) हिजाब विरोधी चळवळ दिवसेंदिवस आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. आता …

Netizens Trolling For  marathi Actress Prajakta Mali On Post For India From London  

मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती …

Leave a Reply

Your email address will not be published.