Top 10 Entertainment News | TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या –

राजू श्रीवास्तव यांनी वयाच्या 59 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं निधन झालं आहे. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. 10 ऑगस्ट रोजी सकाळी व्यायाम करत असताना ते ट्रेड मिलवर कोसळले. त्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजू श्रीवास्तव यांनी त्यांच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता त्यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. 

बिग बींनी मुंबईत घेतलं नवं आलिशान घर

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. अमिताभ हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतात. सध्या बिग बी हे त्यांच्या नव्या घरामुळे चर्चेत आहेत. अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील पार्थेनन बिल्डिंगमध्ये 31 व्या मजल्यावर घर घेतलं आहे. हे घर 12 हजार स्क्वेअरफूटचं आहे.  पण या घरात अमिताभ आणि त्यांचे कुटुंब राहायला जाणार नाही. कारण बिग बींनी हे घर गुंतवणूकीसाठी घेतलं आहे. 

ऑस्करच्या शर्यतीत ‘छेल्लो शो’ची बाजी

ऑस्कर हा चित्रपटक्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो. दरवर्षी जगभरातल्या सर्वोत्तम चित्रपट आणि चित्रपटाशी संबंधित घटकांचा हा पुरस्कार देऊन गौरव केला जातो. यंदाच्या 2023 च्या नामांकनांचे निकाल जाहीर करण्यात आले आहे. या वर्षी ऑस्करच्या शर्यतीत गुजराती चित्रपट‘छेल्लो शो’ ने बाजी मारली आहे. ऑस्कर पुरस्कारासाठी हा सिनेमा भारताच्या अधिकृत प्रवेशासाठी निवडला गेला आहे. 

जाता जाताही खळखळवून हसवून गेला विनोदाचा बादशाह; व्हिडीओ व्हायरल

राजू श्रीवास्तव जेव्हा जेव्हा कॅमेऱ्यासमोर यायचे तेव्हा लोकांना हसवायचे. जातानादेखील ते  सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य सोडून गेले. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या व्हिडीओमध्ये ते लोकांना खळखळून हसवताना दिसत आहेत. ते लोकांना अगदी मजेदार पद्धतीने कोरोना कॉलर ट्यूनची आठवण करून देताना दिसत आहेत. या व्हिडीओत  राजू श्रीवास्तव थोडेसे हसत लोकांना उद्देशून म्हणालेत, कोरोना अजून गेलेला नाही. त्यामुळेच आता सावध राहण्याची गरज आहे. 

‘आयएनटी’त कीर्ती महाविद्यालयानं मारली बाजी

टाळ्या शिट्ट्यांचा कडकडाट, येऊन येऊन येणार कोण, अशा जल्लोषाच्या वातावरणात ‘आयएनटी’ एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी मंगळवारी 20 सप्टेंबरला यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडली आहे. किर्ती महाविद्यालयाच्या उकळी या एकांकिकेने यंदा ‘आयएनटी’त बाजी मारली आहे. 

रिचा आणि अलीच्या लग्नाची पत्रिका चक्क काडेपेटीवर

गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अली फजल त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांची लग्नाची पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

‘आम्ही सारे खवय्ये’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘आम्ही सारे खवय्ये’ हा लोकप्रिय कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून या कार्यक्रमाची प्रतीक्षा करत आहेत. आता घटस्थापनेपासून हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

‘प्रवाह पिक्चर पुरस्कार’ सोहळ्यात एबीपी स्टुडिओची सह-निर्मिती असलेला ‘कारखानिसांची वारी’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

‘कारखानीसांची वारी’ हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अनेक पुरस्कार सोहळ्यात या सिनेमाने बाजी मारली आहे. आता प्रवाह पिक्चर पुरस्कार’ सोहळ्यात एबीपी स्टुडिओची सह-निर्मिती असलेला ‘कारखानिसांची वारी’ हा सिनेमा सर्वोत्कृष्ट ठरला आहे. 

आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयांतील प्रमाणपत्र अभ्यासक्रम 28 सप्टेंबरला होणार सुरू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयांतील
प्रमाणपत्र अभ्यासक्रमांना 28 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. 

आलिया आणि रणबीरच्या ‘ब्रह्मास्त्र’ची बॉक्स ऑफिसवर हवा!

ब्रह्मास्त्र चित्रपटानं 12 व्या दिवशी जवळपास चार कोटींची कमाई केली आहे. रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी या चित्रपटानं 37 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 42 कोटींची कमाई केली. आता बारा दिवसांमध्ये या चित्रपटानं जवळपास 216 कोटींची कमाई केली आहे. जगभरात दहा दिवसांमध्ये या चित्रपटानं 360 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. 


Source link

Check Also

Brahmastra Box Office Collection 425 Crore Worldwide Gross In 25 Days Number 1 Hindi Movie Of 2022

Brahmastra Box Office Collection:  बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia …

Richa-Ali Wedding: रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी बांधली लग्नगाठ; पाहा फोटो!

Richa-Ali Wedding: रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी बांधली लग्नगाठ; पाहा फोटो! Source link

Ponniyin Selvan I Box Office Collection Day 4 Movie Cross 250 Crore

Ponniyin Selvan I:  दिग्दर्शक मणिरत्न यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ (Ponniyin Selvan) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ …

Leave a Reply

Your email address will not be published.