Top 10 Entertainment News Of The Day

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या –

‘ओशन इलेव्हन’ फेम हॉलिवूड स्टार हेन्री सिल्वा यांचे निधन

‘ओशन्स इलेव्हन’ आणि ‘द मंचुरियन कँडीडेट’ यासह अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणारे अभिनेते हेन्री सिल्वा यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते 95 वर्षांचे होते. हॉलिवूड चित्रपटांमध्ये हेन्री यांनी नेहमीच गँगस्टर आणि खलनायकाची प्रत्येक पात्रे खूप छान वठवली. हेन्री यांना वाढत्या वयातील आजारांमुळे मोशन पिक्चर्स अँड टेलिव्हिजन कंट्री हाऊस अँड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हेन्रीचा मुलगा स्कॉट सिल्वा याने त्यांच्या मृत्यूची दुखःद बातमी चाहत्यांना दिली.

वीकेंडला पुन्हा एकदा दिसली ‘ब्रह्मास्त्र’ची धूम!

बॉलिवूड स्टार आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली धूम केली आहे. या चित्रपटाची कमाई पुन्हा एकदा भरारी घेताना दिसत आहे. रणबीर कपूर , आलिया भट्ट , शाहरुख खान, मौनी रॉय , अमिताभ बच्चन आणि नागार्जुन अभिनित चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’च्या  रिलीजला आता एक आठवडा पूर्ण झाला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केली होती. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, शनिवारी अर्थात रिलीजच्या नवव्या दिवशी चित्रपटाने एकूण 15 कोटींची कमाई केली आहे. तर रविवारी चित्रपटाच्या कमाईत 15 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

प्रभास-कृती एकमेकांना डेट करतायत?

साऊथचा सुपरस्टार प्रभास त्याच्या प्रोफेशनल लाईफसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. प्रभाससोबत सतत एखाद्या अभिनेत्रीचे नाव जोडले जात असते. मात्र, सध्या चर्चा रंगलीये ती क्रिती आणि प्रभासच्या जोडीची.. सध्या क्रिती सेनन आणि प्रभासचे नाव एकत्र जोडले जात आहेत. सोशल मीडियावरही त्यांची जोडी सध्या खूप ट्रेंड करत आहे. प्रभास आणि क्रिती सेनन एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात आहे. दोघेही लवकरच ‘आदिपुरुष’ या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर झळकणारे. 

यो यो हनी सिंह करणार जोरदार कमबॅक

रॅपर यो यो हनी सिंह गेल्या बऱ्याच दिवसांपासून आपल्या खाजगी कारणांमुळे मीडियापासून दूर आहे.अनेकांनी हनी सिंहची कारकीर्द संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. अशा परिस्थितीत आपल्या टीकाकारांना सडेतोड उत्तर देण्यासाठी हनी सिंह पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करणार आहे.पंजाबी गायक हनी सिंहने हनी 3.0 अल्बमची घोषणा करत आपल्या चाहत्यांना एक मोठं सरप्राईज दिलं आहे. लवकरच या अल्बमची गाणीही रिलीज होणार आहेत.

विवेक अग्निहोत्रींचं बॉलिवूडबाबत मोठं वक्तव्य

बॉलिवूडच्या बॉयकॉट  संस्कृतीवर  एका न्यूज पोर्टलशी बोलताना विवेक अग्निहोत्री  म्हणाले की, ”हा खूप गुंतागुंतीचा मुद्दा आहे. ‘बॉलिवुडवर बहिष्कार टाका’ मोहीम खरंतर  चांगली आहे कारण बॉलीवूड मध्ये तयार केल्या जाणाऱ्या चित्रपटांविषयी लोकांमध्ये सध्या प्रचंड निराशा आहे.” पुढे विवेक अग्निहोत्री म्हणाले की, ”पण  या ट्रेंडचा अंतिम परिणाम खूप सकारात्मक असेल. कारण बॉलीवूडला सुधारण्यासाठी ही  चांगली संधी आहे. ”

जॅकलीन फर्नांडीसला दिल्ली पोलिसांकडून पुन्हा समन्स

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस गेल्या अनेक दिवसांपासून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. आता ईडीकडून जॅकलीनला पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आलं आहे. 19 सप्टेंबरला (उद्या) जॅकलीनला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. 

‘चारचौघी’ नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग हाऊसफुल्ल

31 वर्षांपूर्वी ‘चारचौघी’ हे नाटक मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन नाटक ठरलं होतं. ‘चारचौघी’ हे दर्जेदार नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग हाऊसफुल्ल पार पडला आहे. नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला नाट्यरसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. शनिवारी, 17 सप्टेंबरला पार्ल्याच्या दीनानाथ नाट्यगृहात या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. 

जॅकलीन फर्नांडीसला दिल्ली पोलिसांकडून पुन्हा समन्स

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस गेल्या अनेक दिवसांपासून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. आता ईडीकडून जॅकलीनला पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आलं आहे. 19 सप्टेंबरला (उद्या) जॅकलीनला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. 

मुसळधार पावसात आशा भोसलेंनी लाडक्या नातीसोबत घेतला जपानी भोजनाचा आनंद

लोकप्रिय गायिका आशा भोसले आजही अनेक लहान-लहान गोष्टींत आनंद शोधतात. संगीतासोबतच त्यांना कुकिंगचीदेखील आवड आहे. जगभरात त्यांचे अनेक रेस्टॉरंट्स आहेत. आशा भोसले नुकत्याच त्यांची लाडकी नात जनाईसोबत जपानी भोजनाचा आनंद घेताना दिसून आल्या आहेत. 

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत नवा ट्विस्ट

अविनाशमुळे नेहा आणि यशच्या नात्यात दुरावा आला होता. अविनाशने नेहा आणि यशला फसवलं होतं. नेहाने अविनाश तिचा पहिला नवरा असल्याचे सत्य लपवण्याने यशला प्रचंड राग आला होता. पण आता यशसमोर अविनाशचा खरा चेहरा आल्याने मालिकेत पुन्हा नवा ट्विस्ट येणार आहे. आता नेहा आणि परी पुन्हा एकदा चाळ सोडून पॅलेसवर राहायला जाणार आहेत. 


Source link

Check Also

Prabhas Saif Ali Khan And Kriti Sanon Starrer Adipurush First Poster Out

Adipurush Poster Out: साऊथचा सुपरस्टार प्रभासच्या (Prabhas) बहुप्रतीक्षित ‘आदिपुरुष’ (Adipurush) या चित्रपटाचे पहिले अधिकृत पोस्टर …

Turkish Melek Mosso Cut Her Hair For Iran Hijab Row Support Video Viral

Iran Hijab Protest: इराणमधील (Iran) हिजाब विरोधी चळवळ दिवसेंदिवस आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. आता …

Netizens Trolling For  marathi Actress Prajakta Mali On Post For India From London  

मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती …

Leave a Reply

Your email address will not be published.