Top 10 Entertainment News Of The Day

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या –

अमिताभ बच्चन यांच्या ‘गुडबाय’चा ट्रेलर रिलीज

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या आगामी ‘गुडबाय’ सिनेमामुळे चर्चेत आहेत. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून ट्रेलरला चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. ‘गुडबाय’ या सिनेमाच्या माध्यमातून दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 

राजीव गांधी यांच्या हत्येमागील षडयंत्रावर लवकरच येणार Trail Of An Assasin वेबसीरिज

राजीव गांधी यांच्या हत्येमागील षडयंत्रावर लवकरच एक वेब सीरिज येणार आहे. अप्लॉज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली या वेबसीरिजची निर्मिती करण्यात आली आहे. ‘नाइनटी डेज : द ट्रू स्टोरी ऑफ द हंट फॉर राजीव गांधीज असैसिन’ या पुस्तकावर आधारित ही वेब सीरिज असणार आहे. ‘ट्रेल ऑफ अॅन असॅसिन’ असं या वेबसीरिजचं नाव आहे. 

आलियाने इंस्टाग्रामवर पार केला 70 मिलियनचा टप्पा

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने 2022 हे वर्ष खूप गाजवलं. आलियाचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा सिनेमा सुपरहिट ठरला. त्यानंतर आलिया भट्ट चॉकलेट बॉय रणबीर कपूरसोबत लग्नबंधनात अडकली. आता आलियाने कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोणला मागे टाकलं आहे. आलियाने इंस्टाग्रामवर 70 मिलियनचा टप्पा पार केला आहे. 

नेहा कामत या व्यक्तिरेखेला निरोप देताना प्रार्थना बेहेरे भावूक

प्रार्थना बेहेरने नेहा कामत या व्यक्तिरेखेला निरोप देताना खास पोस्ट लिहिली आहे. व्यक्तिरेखेचा निरोप घेताना प्रार्थना भावुक झाली आहे. तिने नेहाला एक स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिलं आहे,”अभी ना जाओ छोडकर…के दिल अभी भरा नही”. तसेच नेहा कामत म्हणून हे शेवटचं रील असेल असंदेखील तिने म्हटलं आहे. प्रार्थनाची ही पोस्ट सध्या व्हायरल होत असून ‘आम्हालादेखील आता नेहाची आठवण येईल’ अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत. 

‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला

शिक्षणासाठीची जिद्द आणि स्वप्नांची ओढ असा वेगळा विषय हाताळत ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ ही नवी मालिका सोनी मराठी वाहिनीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शिक्षणाच्या जिद्दीचा अनोखा प्रवास या मालिकेच्या माध्यमातून उलगडणार आहे. 

बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला ‘लाल सिंह चड्ढा’ ओटीटीवर होणार रिलीज

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. आमिर खानच्या या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी  केली. बॉयकॉट लाल सिंह चड्ढा हा ट्रेंड देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. याचा परिणाम या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर झाला. पण आता हा चित्रपट ज्यांनी चित्रपटगृहात जाऊन पाहिला नाही, ते आता घरबसल्या पाहू शकणार आहेत.  लाल सिंह चड्ढा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे. लाल सिंह चड्ढा हा चित्रपट  नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. 20 ऑक्टोबरला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे, असं म्हटलं जात आहे. 

अथिया-केएल राहुलच्या लग्नाची लगबग सुरु!

बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुल लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. दोघांमधील नातं आता कोणापासूनही लपून राहिलेलं नाही. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. केएल राहुल आणि अथिया मीडियामध्ये एकमेकांबद्दल बोलणे टाळतात, परंतु दोघेही सोशल मीडियाद्वारे एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता ही जोडी लवकरच सात फेरे घेणार आहे. लग्न सोहळ्यासाठी त्यांनी एका खास ठिकाणाची निवड केली आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, त्यांचे लग्न एखाद्या महागड्या रिसॉर्ट किंवा हॉटेलमध्ये होणार नसून, खंडाळा येथील सुनील शेट्टीच्या बंगल्यात होणार आहे. केएल राहुल आणि अथिया या वर्षी डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लग्न बंधनात अडकू शकतात.

रणबीर-आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ बॉक्स ऑफिस गाजवणार!

‘ब्रह्मास्त्र’च्या रिलीजला अद्याप चार दिवस बाकी असतानाही या चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. पीव्हीआर सिनेमाने या चित्रपटाच्या एक लाख तिकिटांची अ‍ॅडव्हान्स बुकिंग झाल्याचे म्हटले आहे. अ‍ॅडव्हान्स बुकिंगचा हा आकडा पाहता या चित्रपटाने ‘आरआरआर’ आणि ‘भूल भुलैया 2’ला देखील मागे टाकल्याचे म्हटले जात आहे. अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या आकड्यांनुसार हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली ओपनिंग करू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.

रोहित शेट्टीनं घेतली अमित शाह यांची भेट

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर होते. यादरम्यान अमित शाह यांनी बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीची भेट घेतली. रोहित शेट्टीने इंस्टाग्रामवर अमित शहा यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अमित शाह आणि रोहित शेट्टी हे चर्चा करताना दिसत आहेत. फोटो शेअर करताना रोहित शेट्टीने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जी यांना भेटणे ही सन्मानाची गोष्ट आहे.’

‘हिन्दुत्व’चे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

गेल्या काही दिवसांपासून करण राजदान यांचा हिन्दुत्व हा चित्रपट चर्चेत आहे. यापूर्वी  हिन्दुत्व या चित्रपटाचे एक मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले होते. ज्यामध्ये चित्रपटाचा मुख्य अभिनेता आशिष शर्मा शंख वाजवताना दिसला होता. आता  हिन्दुत्वच्या नव्या मोशन पोस्टरवर, अंकित राज आणि सोनारिका भदोरिया यांची झलक पाहायला मिळत आहे.  करण राजदान यांचा हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित होणार आहे. आशिष शर्मानं हिन्दुत्व या चित्रपटाचा नवा मोशन पोस्टर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिले, ‘हिंदुत्व म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाणारा प्रवास, अंधाराकडून प्रकाशाकडे जाणे म्हणजे हिंदुत्व’. 


Source link

Check Also

Netizens Trolling For  marathi Actress Prajakta Mali On Post For India From London  

मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती …

PHOTO: कॅमेऱ्यात कैद झाला TMC खासदार नुसरत जहाँचा ब्रालेट लूक; पाहा फोटो!

PHOTO: कॅमेऱ्यात कैद झाला TMC खासदार नुसरत जहाँचा ब्रालेट लूक; पाहा फोटो! Source link

Ranveer Singh Talks About His Relationship With Deepika Padukone Amid Separation Rumours

Ranveer Singh, Deepika Padukone : बॉलिवूडची ‘मस्तानी’ अर्थात अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि ‘बाजीराव’ …

Leave a Reply

Your email address will not be published.