Tired Of Eating Ladoo Modak Kheer Know The Recipe For Making Lavang Latika

Lavang Latika Recipe : घरोघरी बाप्पाचं दोन वर्षानंतर जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे. सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा माहोल आहे. बाप्पाला दररोज वेग-वेगळ्या पदार्थांचा नैवेद्य देण्यात येत आहे. त्यामुळे दररोज काय नवीन पदार्थ बनवावा असा प्रश्न गृहिणींना पडतो. लाडू, मोदक, खीर हे महाराष्ट्रीयन पदार्थ तर नेहमीच बनवले जातात. तर आज ‘लवंग लतिका’ (Lavang Latika) हा बंगाली पदार्थ बनवण्याची कृती जाणून घ्या… 

‘लवंग लतिका’ बनवण्यासाठी लागणारे साहित्य –

पारी बनवण्याचे साहित्य –

 • रवा – 2 चमचे
 • मैदा – 2 कप
 • तूप – 1 चमचा
 • खायचा सोडा – चिमूटभर
 • साखर – 1 चमचा

सारणाचे साहित्य –

 • खवा – 1 कप
 • रवा – 1 चमचा
 • पिठीसाखर – 2 चमचे
 • वेलचीपूड – 1 चमचा
 • ड्रायफ्रुट पावडर – 2 चमचे

पाकाचे साहित्य –

 • साखर – 2 कप
 • पाणी – 1 कप
 • केसर – 4 ते 5
 • तूप – तळण्यासाठी
 • लवंग – 20 ते 25

‘लवंग लतिका’ बनवण्याची कृती

– मैद्यामध्ये सोडा, साखर आणि गरम तेल किंवा तूप टाकून पीठ मळून घ्यावे. 
– कढईमध्ये रवा, खवा भाजून घ्यावे.
– भाजलेला रवा, खवा थंड झाल्यानंतर त्यात पिठीसाखर वेलची पूड, काजू-बदाम पावडर घालून मिश्रण करून सारण तयार करावे. 
– साखर व पाणी एकत्र करून पाक करून घ्यावा. 
– तयार झालेल्या पाकात केसर घालावे. 
– पिठाच्या छोट्या पुऱ्या लाटून एक चमचा सारण भरून घट्ट वळकुटी करून वेटोळा घाला आणि त्यावर एक लवंग खोचा. 
– अशाप्रकारच्या सर्व ‘लवंग लतिका’ बनवून घ्याव्यात. 
– ‘लवंग लतिका’ कढईमध्ये तूप गरम करून मंद आचेवर तळून घ्याव्यात. 
– नंतर पाकामध्ये दोन-तीन मिनिटे बुडवून ठेवाव्यात. 
– नंतर एका ताटात काढून थंड झाल्यावर खायला घ्याव्यात. 

संबंधित बातम्या

Sanjori Recipe : बाप्पासाठी दररोज कोणता नवीन पदार्थ बनवायचा विचार करताय? जाणून घ्या सांजोरी बनवण्याची रेसिपी

Kheer Recipe : गौरीचं स्वागत करा गोडाधोडाने; जाणून घ्या स्वादिष्ट तांदळाची खीर बनवण्याची रेसिपी


Source link

Check Also

Benefits Of Raisins : भिजवलेल्या मनुक्याचे अनेक गुणकारी फायदे

Benefits Of Raisins : भिजवलेल्या मनुक्याचे अनेक गुणकारी फायदे Source link

Hair Care Tips How To Increase Hair Volume Naturally Marathi News

Hair Care Tips : स्त्री असो किंवा पुरुष प्रत्येकालाच आपले केस (Hair) प्रिय असतात. केस …

5 ways to walk to slow down ageing and stay young

Walking is the most basic, but important way to stay fit. But most of us …

Leave a Reply

Your email address will not be published.