The New Poster Of The Marathi Movie Aapdi Thaapdi Has Come To The Audience

Aapdi Thaapdi : श्रेयस तळपदेने (Shreyas Talpade) मराठी मनोरंजनक्षेत्रासह बॉलिवूडमध्येदेखील आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barve) लवकरच ‘आपडी थापडी’ (Aapdi Thaapdi) या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

‘आपडी थापडी’ हा सिनेमा 5 ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. नुकतच या सिनेमाचं पोस्टर लॉंच करण्यात आलं असून सोशल मीडियावर चांगलचं व्हायरल होत आहे. ‘आपडी थापडी’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा आनंद करीर यांनी केली असून के सायलेंटच्या केसी पांडे यांनी निर्मिती केली आहे. 


श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वेसह ‘आपडी थापडी’ या सिनेमात नंदू माधव, संदीप पाठक, नवीन प्रभाकर, खुशी हजारे अशा दमदार स्टारकास्ट या सिनेमात आहे. ‘फॅमिलीचा सिनेमा बघा फॅमिली बरोबर’ अशी या सिनेमाची टॅगलाईन आहे. सिनेमाचं पोस्टर आऊट झाल्याने प्रेक्षक आता सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

श्रेयस तळपदेनं मराठी मालिका आणि सिनेमांच्या माध्यमातून कारकिर्द सुरू केली आहे. त्यानंतर त्यानं हिंदी सिनेमांत आपलं स्थान निर्माण केलं. ‘बाजी’ आणि ‘पोस्टर बॉईज’ या सिनेमांनंतर जवळपास सात वर्षांनी श्रेयस तळपदे पुन्हा एकदा रुपेरी पड्यावर झळकणार आहे.  त्याच्याबरोबर मुक्ता बर्वेसारखी सशक्त अभिनेत्री असल्यानं आपडी-थापडी नक्कीच प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना दसऱ्याची प्रतीक्षा आहे. 

संबंधित बातम्या

Vikram Vedha Trailer : अॅक्शन, ड्रामा अन् थ्रील; ‘विक्रम वेधा’ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज!

Thank God poster : थँक गॉडमधील अजयचा लूक रिलीज; शेअर केली खास पोस्ट
Source link

Check Also

Gandhi Jayanti 2022 The Only Hindi Film Mohandas Karamchand Gandhi AKA Mahatma Gandhi Watched Was Ram Rajya

Gandhi Jayanti 2022 : आज 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची जयंती …

Gandhi Jayanti Mahatma Gandhi Birth Anniversary Bollywood Actors Who Played The Gandhi In Films

मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 2 ऑक्टोबर रोजी जयंती. त्यानिमित्ताने देशभर गांधीजींचं स्मरण केलं जातंय. …

PHOTO : बेन किंग्जले ते नसरुद्दीन शाह… या अभिनेत्यांनी साकारले 'गांधी'

PHOTO : बेन किंग्जले ते नसरुद्दीन शाह… या अभिनेत्यांनी साकारले 'गांधी' Source link

Leave a Reply

Your email address will not be published.