The Audience Will Be Treated To A Feast Of Entertainment Over The Weekend Four Movies And Three Web Series Released On OTT

Weekend OTT Release : ओटीटीवर (OTT) प्रत्येक आठवड्यात अनेक सिनेमे आणि वेबसीरिज प्रदर्शित होत असतात. सिनेप्रेमींसाठी यंदाचा विकेंड खास ठरणार आहे. या आठवड्यातदेखील प्रेक्षकांना रोमान्स, अॅक्शन, थ्रिलर आणि अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. या वीकेंडला प्रेक्षकांना चार सिनेमे आणि तीन वेबसीरिज पाहायला मिळणार आहेत. या आठवड्यात प्रेक्षकांना ‘सीता रामम’ पासून ‘एक विलन रिटर्न्‍स’ पर्यंत अनेक वेबसीरिज आणि सिनेमे पाहायला मिळणार आहेत. 

सीता रामम (Sita Ramam) : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता ‘सीता रामम’ (Sita Ramam) हा सिनेमा प्रेक्षक ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. हा सिनेमा ओटीटीवर तेलुगू, तामिळ आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला आहे. हनु राघवापुडीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमाचं कथानक 1964 च्या काळावर आधारित आहे. हा सिनेमा 9 सप्टेंबरला अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे. 

एक विलन रिटर्न्‍स (Ek Villain Returns) : ‘एक विलन रिटर्न्‍स’ हा सिनेमा सिनेमागृहात आपली जादू दाखवण्यात कमी पडला आहे.मोहित सुरीने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. अर्जुन कपूर, तारा सुतारिया, जॉन अब्राहम आणि दिशा पाटनी या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा 2014 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘एक विलन’चा सीक्वल आहे. या सिनेमात थरार नाट्य दाखवण्यात आलं आहे. हा सिनेमा 9 सप्टेंबरला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. 

थॉर: लव्ह अॅन्ड थंडर (Thor: Love and Thunder) : मार्वल स्टूडिओजच्या ‘थॉर: लव्ह अॅन्ड थंडर’ या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. जगभरात या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. आता हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. 

पिनोकियो (Pinocchio) : ‘पिनोकियो’ हा सिनेमा 8 सप्टेंबरला डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना सांगितिक मेजवानी मिळणार आहे. रॉबर्ट जेमेकिसने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. टॉम हॅक्स, सिंथिया एरिवो, लूक एवांस या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ‘पिनोकियो’ हा सिनेमा इंग्रजीसह हिंदीदेखील प्रदर्शित झाला आहे. 

कोबरा काय : सीझन 5 (Cobra Kai : Season 5) : ‘कोबरा काय’ ही नेटफ्लिक्सची लोकप्रिय वेब सीरिज आहे. आता या वेबसीरिजचा पाचवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या सीरिजची प्रतीक्षा करत होते. पण आता या वीकेंडला प्रेक्षक घरबसल्या ही सीरिज पाहू शकतात. 

संबंधित बातम्या

Brahmastra Collection : जगभरात ‘ब्रह्मास्त्र’चा डंका! पहिल्याच दिवशी केली 75 कोटींची कमाई; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

Suriya 42 Mostion Poster : सूर्याच्या आगामी सिनेमाची घोषणा; पोस्टर शेअर करत म्हणाला…


Source link

Check Also

Brahmastra Box Office Collection 425 Crore Worldwide Gross In 25 Days Number 1 Hindi Movie Of 2022

Brahmastra Box Office Collection:  बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia …

Richa-Ali Wedding: रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी बांधली लग्नगाठ; पाहा फोटो!

Richa-Ali Wedding: रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी बांधली लग्नगाठ; पाहा फोटो! Source link

Ponniyin Selvan I Box Office Collection Day 4 Movie Cross 250 Crore

Ponniyin Selvan I:  दिग्दर्शक मणिरत्न यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ (Ponniyin Selvan) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ …

Leave a Reply

Your email address will not be published.