Swara Bhasker Said Shah Rukh Khan Ruined My Love Life Know The Behind Story

Swara Bhasker : बॉलिवूडची बिनधास्त आणि बेधडक अभिनेत्री म्हणून स्वरा भास्करचे (Swara Bhasker) नाव नेहमीच घेतले जाते. अभिनेत्री आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. आता स्वरा भास्कर लवकरच ‘जहां चार यार’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या स्वरा तिच्या याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र, आता पुन्हा एकदा स्वरा चर्चेत आलीये ती तिच्या हटके वक्तव्यामुळे.. आगामी चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान स्वरा भास्करने शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि आदित्य चोप्रावर (Aditya Chopra) तिचे लव्ह-लाईफ उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला होता. या वक्तव्यानंतर स्वरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

आगामी चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान एका मुलाखतीत स्वरा म्हणाली की, ‘माझं लव्हलाईफ उद्ध्वस्त करण्यासाठी मी आदित्य चोप्रा सर आणि शाहरुख खान यांना जबाबदार धरते. शाहरुख खानचा दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (DDLJ) हा चित्रपट मी तरुण वयात पाहिला आणि तेव्हापासून मी माझ्या आयुष्यातील ‘राज’च्या शोधात होते, जो हुबेहूब शाहरुखसारखा असेल. खऱ्या आयुष्यात ‘राज’ नसतो, हे समजायला मला बरीच वर्षे लागली. त्यामुळे मी रिलेशनशिपमध्ये फारशी रमेन, असे मला वाटत नाही. सिंगल लाईफ कठीण असली, तरी जोडीदार शोधणे त्याहून कठीण आहे.’

लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

अभिनेत्री स्वरा भास्कर लवकरच ‘जहां चार यार’ चित्रपटात दिसणार आहे. अलीकडेच या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्रीने मुलाखतीत हे गंमतीशीर वक्तव्य केलं आहे. तब्बल चार वर्षांच्या ब्रेकनंतर स्वरा (Swara Bhasker) पडद्यावर परतणार आहे. आगामी ‘जहां चार यार’ या चित्रपटात अभिनेत्री स्वरा व्यतिरिक्त अभिनेत्री पूजा चोप्रा, शिखा तलसानिया आणि मेहर विज देखील या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात चार मैत्रिणींची कथा दाखवण्यात येणार आहे. महिला केंद्रित असलेला हा चित्रपट 16 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

बॉयकॉट ट्रेंडवर झाली व्यक्त!

‘बॉयकॉट’ ट्रेंडवर बोलताना स्वरा भास्कर (Swara Bhasker) म्हणाली की, ‘मला अशा प्रकारची विभागणी आवडत नाही. एक कलाकार म्हणून मला वाटतं की, चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली, तर ते सर्वांसाठीच चांगले आहे. एखाद्याचे अपयश साजरे करणे किंवा दुसर्‍याच्या यशाचा मत्सर करणे, खूप मूर्खपणाचे लक्षण आहे. तुम्ही एखाद्या अभिनेत्याला नापसंत करू शकता आणि नेपोटीझमबद्दल बोलू शकता. परंतु, चित्रपट उद्योग प्रत्यक्षात अनेक रोजगार निर्माण करतो. त्यातून लोकांना पैसा मिळत आहे. त्यामुळे अशा ट्रेंडचा गवगवा होऊ नये, असे मला वाटते.’

हेही वाचा :

In Pics : ब्लॅक ड्रेसमध्ये स्वराचा बोल्ड अंदाज, चाहते म्हणतात…

Swara Bhasker : उदयपुर प्रकरणावर ट्वीट केल्याने स्वरा भास्कर झाली ट्रोल, अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडे बोल!


Source link

Check Also

Brahmastra Box Office Collection 425 Crore Worldwide Gross In 25 Days Number 1 Hindi Movie Of 2022

Brahmastra Box Office Collection:  बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia …

Richa-Ali Wedding: रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी बांधली लग्नगाठ; पाहा फोटो!

Richa-Ali Wedding: रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी बांधली लग्नगाठ; पाहा फोटो! Source link

Ponniyin Selvan I Box Office Collection Day 4 Movie Cross 250 Crore

Ponniyin Selvan I:  दिग्दर्शक मणिरत्न यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ (Ponniyin Selvan) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ …

Leave a Reply

Your email address will not be published.