SS Rajamouli RRR Movie Included In Top 5 Movies Name In The Variety Prediction List

RRR Movie : अभिनेता राम चरण (Ram Charan), ज्युनिअर एनटीआर (Jr NTR) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) स्टारर ‘आरआरआर’ (RRR) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच धूम केली होती. आता मात्र चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता चित्रपट ऑस्करवारी करू शकतो, असे म्हटले जात आहे. या चित्रपटाने यावर्षी बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई केली आहे. दरम्यान, आता ‘आरआरआर’ ऑस्करच्या यादीत सामील होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ऑस्करच्या शर्यतीत दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या या चित्रपटाच्या नावाची चर्चा आहे.

अमेरिकन मीडिया कंपनी, ‘व्हरायटी’ने ऑस्करसाठी विविध श्रेणींमध्ये नामांकन मिळणाऱ्या चित्रपटांची संभाव्य यादी जाहीर केली आहे. या यादीत समाविष्ट केलेल्या दोन श्रेणींमध्ये ‘RRR’चे नाव सामील करण्यात आले आहे. ‘व्हरायटी’नुसार, बॉक्स ऑफिसवर हिट झालेल्या ‘RRR’ ला त्यातील ‘दोस्ती’ या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत नामांकन मिळू शकते. एमएम कीरवानी यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे चित्रपटातील राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर यांच्या मैत्रीवर आधारित आहे.

ऑस्करच्या संभाव्य यादीमध्ये ‘आरआरआर’चा समावेश

जगातील सर्वात मोठा चित्रपट पुरस्कार सोहळा अर्थात ऑस्करसाठी तयार करण्यात आलेल्या या संभाव्य यादीमध्ये राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर यांच्या ‘आरआरआर’ला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीमध्ये टॉप 5मध्ये स्थान देण्यात आले आहे. ‘दोस्ती’ या गाण्यालाही सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाण्याच्या श्रेणीत टॉप 5 गाण्यांसोबत स्थान मिळाले आहे. ऑस्करची ही संभाव्य यादी पाहून ‘आरआरआर’ चित्रपटाचे चाहते देखील आनंदी झाले आहेत.

बॉक्स ऑफिसवर ‘आरआरआर’ची धमाल!

550 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या एसएस राजामौली यांच्या ‘RRR’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. ज्युनिअर एनटीआर आणि राम चरणची जोडी लोकांना इतकी आवडली की, या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 903.68 कोटी रुपये कमावले. एवढेच नाही, तर राजामौली यांच्या चित्रपटाला विदेशातही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या चित्रपटाने परदेशात 208.02 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. म्हणजेच जगभरातील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने एकूण 1111.7 कोटींची कमाई केली. 1000 कोटींचा टप्पा पार करणारा एसएस राजामौली यांचा हा दुसरा चित्रपट आहे.

तेलुगु पीरियड ड्रामा ‘RRR’ ने या वर्षाच्या सुरुवातीला बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले. हा चित्रपट 25 मार्च रोजी सिनेमागृहात रिलीज झाला होता. ‘आरआरआर’ हा बिग बजेट चित्रपट होता. एसएस राजामौली यांनी केवळ खर्चाची परतफेड केली नाही, तर प्रत्येक गुंतवणूकदार आणि भागीदाराने या चित्रपटाच्या माध्यमातून पैसे कमावले आहेत.

संबंधित बातम्या

RRR Hindi On Netflix : ज्युनियर एनटीआरच्या वाढदिवसाची प्रेक्षकांना खास भेट! नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार ‘RRR’


Source link

Check Also

Gandhi Jayanti 2022 The Only Hindi Film Mohandas Karamchand Gandhi AKA Mahatma Gandhi Watched Was Ram Rajya

Gandhi Jayanti 2022 : आज 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची जयंती …

Gandhi Jayanti Mahatma Gandhi Birth Anniversary Bollywood Actors Who Played The Gandhi In Films

मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 2 ऑक्टोबर रोजी जयंती. त्यानिमित्ताने देशभर गांधीजींचं स्मरण केलं जातंय. …

PHOTO : बेन किंग्जले ते नसरुद्दीन शाह… या अभिनेत्यांनी साकारले 'गांधी'

PHOTO : बेन किंग्जले ते नसरुद्दीन शाह… या अभिनेत्यांनी साकारले 'गांधी' Source link

Leave a Reply

Your email address will not be published.