Sri Lanka Vs Pakistan Asia Cup 2022 Match Know Probable Playing 11

Sri Lanka vs Pakistan Live : आशिया कप 2022 (Asia Cup 2022) या भव्य स्पर्धेची आता सांगता होणार आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान  (Sri Lanka vs Pakistan) असा पार पडणार आहे. विशेष म्हणजे या दोन्ही संघाची स्पर्धेतील सुरुवात खराब झाली होती. एकीकडे श्रीलंकेला अफगाणिस्तानने (SL vs AFG) तर पाकिस्तानला भारताने (IND vs PAK) मात दिली होती. पण नंतर उर्वरीत सामन्यात दोघांनी कमाल खेळत करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे आता आता अंतिम सामन्यात दोन्ही संघ नेमके खेळाडू घेऊन उतरणार हे पाहणं महत्त्वाचं असेल…

यावेळी पाकिस्तान संघाचा विचार करता त्यांनी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सुपर 4 च्या सामन्यात अष्टपैलू स्टार खेळाडू शादाब खान आणि युवा गोलंदाज नसीम शाह यांना विश्रांती दिली होती. त्यांच्या जागी उस्मान कादिर आणि हसन अली यांना संघात घेण्यात आलं होतं. पण आता फायनलमध्ये शादाब खान आणि नसीम शाह दोघंही परतले असल्याने उस्मान कादिर आणि हसन अलीला विश्रांती दिली जाऊ शकते.  शाहनवाज दाहानीचंही पुनरागमन होऊ शकतं. 

पाकिस्तान संभाव्य अंतिम 11

बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, खुशदिल शाह, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद हसनैन, हारिस रौफ, शाहनवाज दहानी

श्रीलंकेत बदलाची शक्यता नाही

दुसरीकडे श्रीलंका संघाचाल विचार करता आशिया चषक 2022 मध्ये, श्रीलंकेचे दोन्ही सलामीवीर पथुम निसांका आणि कुसल मेंडिस यांनी आतापर्यंत उत्कृष्ट खेळ दाखवला आहे. तसंच कर्णधार दासुन शनाकाने डेथ ओव्हर्समध्ये शानदार फलंदाजी केली आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा संघ कोणताही बदल न करता जाऊ शकतो, असे मानले जात आहे.

श्रीलंका संभाव्य अंतिम 11

दसुन शनाका (कर्णधार), दनुष्का गुणथिलका, पथुम निसंका, कुसल मेंडिस, चरित असलंका, भानुका राजपक्षे, दिलशान मदुशंका, धनंजया डी सिल्वा, वानंदु हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश तीक्ष्णा.

हे देखील वाचा-  


Source link

Check Also

3rd T20I: SA win inconsequential match; India unflustered in loss

The third umpire wanted confirmation when Tristan Stubbs’s low grab off Suryakumar Yadav – plucked …

IND Vs SA 3rd T20 Match Highlights South Africa Won By 49 Runs Against India Holkar Stadium Dinesh Karthik 46 Runs Off 21

IND vs SA 3rd T20:  रिले रोसो (Rilee Rossouw)- क्विंटन डी कॉकच्या (Quinton de Kock) …

Watch: Mohammed Siraj on the receiving end of Deepak Chahar’s tirade after error leads to six

Mohammed Siraj was on the receiving end of a tirade from bowler Deepak Chahar when …

Leave a Reply

Your email address will not be published.