Singer Neha Kakkar Troll On Social Media After She Recreate Falguni Pathak Song Maine Payal Hai Chhankai

Maine Payal Hai Chhankai : गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) तिच्या गाण्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र, सध्या ती चर्चे आलीये ती एका वेगळ्याच कारणामुळे…नुकत्याच रिलीज झालेल्या ‘ओ सजना’ या गाण्यासाठी गायिका नेहा कक्करला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. नेहाचे हे गाणे 1999मध्ये रिलीज झालेल्या फाल्गुनी पाठकच्या (Falguni Pathak) ‘मैने पायल है छनकाई…’ (Maine Payal Hai Chhankai) या गाण्याचे रिमिक्स व्हर्जन आहे. फाल्गुनी पाठक यांनी गायलेले हे मूळ गाणे 90च्या दशकात लोकांच्या गळ्यातील ताईत बनले होते. मात्र, आता या गाण्याच्या रिमिक्स व्हर्जनवर चाहते नाराज झाले आहेत. खुद्द फाल्गुनी पाठक यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नेहा कक्करने 90 च्या दशकातील हिट पॉप गायिका फाल्गुनी पाठकचे ‘मैने पायल है छनकाई’ हे लोकप्रिय गाणे रिक्रिएट केले आहे. या गाण्याच्या रिक्रिएट व्हर्जनला अनेक लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले असतील, पण यामुळे नेहा कक्करवर चाहते नाराज झाले असून, ते तिला ट्रोल करत आहे.

काहींना आवडले गाणे,तर काहींनी केली टीका!

नेहा कक्करने गायलेले हे गाणे काही प्रेक्षकांना खूप आवडले आहे. तर, काही लोक मात्र या गाण्याबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. 19 सप्टेंबर रोजी रिलीज झालेल्या ‘मैने पायल है छनकाई’ हे गाणे ऐकल्यानंतर सोशल मीडियावर अनेक युजर्सनी नेहा कक्करवर सडकून टीका करण्यास सुरुवात केली. ‘आमच्या चांगल्या गाण्याची वाट लावली’ म्हणत नेटकरी नेहावर संतापले आहेत.

गायिका नेहा कक्कर रिमिक्स गाण्यासाठी ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही तिने अशीच अनेक जुनी गाणी रिमिक्स केली असून, त्यामुळे तिच्यावर बरीच टीका झाली आहे. आता नेहाने हे गाणे रीक्रिएट केल्यावर फाल्गुनी पाठक यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

फाल्गुनी पाठक म्हणतात…

या संदर्भात मीडियाशी बोलताना फाल्गुनी पाठक म्हणाल्या, मी माझ्या चाहत्यांचा आभारी आहे की, त्यांनी आजपर्यंत माझ्या गाण्याला आनंदाने प्रतिसाद दिला. कारण या गाण्यात मनाला भावणारा साधेपणा होता. मी अजून नेहाचा व्हिडीओ पाहिला नाही, मी तो आवर्जून बघेन. कोणतेही गाणे बनवताना त्याचे संगीत, गीत, चित्रीकरण, त्यातील साधेपणा हे खूप महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे कोणताही म्युझिक व्हिडीओ बनवताना या सर्व गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

सोशल मीडियावर नेहाला ट्रोल करण्यास सुरुवात झाली असतानाच, फाल्गुनी पथक यांनीही आपल्या सोशल मीडिया स्टोरीवर या गाण्यावरील प्रतिक्रियांचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत, ज्यात नेहाच्या गाण्याला ट्रोल करण्यात आले आहे. या स्क्रीनशॉट्समध्ये एका यूजरने लिहिले की, फाल्गुनी पाठकने नेहा कक्करवर कारवाई करावी. नेहा कक्करने आमचे आवडते गाणे खराब केले आहे. नेहा कक्कर आणि टोनी कक्कर यांनी हे गाणे गायले आणि संगीतबद्ध केले आहे.

हेही वाचा :

Falguni Pathak : फाल्गुनी पाठक यांच्या दांडियाविरोधात हायकोर्टात याचिका; 21 सप्टेंबरला सुनावणीची शक्यता


Source link

Check Also

Annu Kapoor Victim Of Cyber Fraud  actor Lost 4 Lac Rupees In Online Fraud

Annu Kapoor : भारतीय चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर (Annu Kapoor) अनेकदा त्यांच्या हटके …

Gandhi Jayanti 2022 The Only Hindi Film Mohandas Karamchand Gandhi AKA Mahatma Gandhi Watched Was Ram Rajya

Gandhi Jayanti 2022 : आज 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची जयंती …

Gandhi Jayanti Mahatma Gandhi Birth Anniversary Bollywood Actors Who Played The Gandhi In Films

मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 2 ऑक्टोबर रोजी जयंती. त्यानिमित्ताने देशभर गांधीजींचं स्मरण केलं जातंय. …

Leave a Reply

Your email address will not be published.