Shahid Kapoor Mira Rajput Shift In 58 New House In Mumbai Bandra

Shahid Kapoor: बॉलिवूडमधील सेलिब्रिटी हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकवेळा चर्चेत असतात. या सेलिब्रीटींची लग्झरी लाईफस्टाईल अनेकांचे लक्ष वेधले. सध्या अभिनेता शहिद कपूर  (Shahid Kapoor) हा त्याच्या नव्या घरामुळे चर्चेत आहे.  शाहीदची पत्नी मीरा राजपूत (Mira Rajput)  आणि शाहिद यांनी त्यांच्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. या नव्या घरात मीरा आणि शाहिदनं पूजा देखील केली. जाणून घेऊयात मीरा आणि शाहिदच्या घराची किंमत आणि या घराची खासियत….

चार  वर्षांपूर्वी शाहिद आणि मीरा यांनी मुंबईतील वांद्रे वरळी सी-लिंक जवळ असलेलं हे आलिशन घर विकत घेतलं. गेल्या काही महिन्यांपासून या घराच्या इंटरिअरचे काम सुरु होते. मीरा ही या घराच्या इंटेरिअरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत होती. रिपोर्टनुसार, या घराची किंमत 58 कोटी रुपये आहे.  वांद्रे वरळी सी-लिंक जवळील  ‘360-वेस्‍ट’ या बिल्डींगच्या 42 व्या आणि 43 व्या मजल्यावर शाहिदचे हे डिप्लेक्स अपार्टमेंट आहे. शाहिदचं हे घर 8,625 स्क्वेअर फीटचे आहे. एका मुलाखतीमध्ये शाहिदनं नव्या घराबाबत सांगितलं होतं. तो म्हणाला होता, ‘मीशा आणि जॅनच्या जन्मानंतर जुनं घर छोटं वाटत होतं. त्यामुळे आम्ही नवं घरं घेण्याचा निर्णय घेतला.’ याच बरोबर शाहिदनं सहा पार्किंग स्लॉट देखील खरेदी केले आहेत. रेंज रोवर वॉग कार, मर्सिडीज एएमजी एस-400 यांसारख्या लग्झरी गाड्या आहेत. 

शाहिदचे चित्रपट

शाहिदच्या चित्रपटांना त्याच्या चाहत्यांची नेहमी पसंती मिळते. त्याच्या ‘जर्सी’, कबीर सिंह, पद्मावत, जब वी मेट यांसारख्या चित्रपटातील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. शाहिद आपल्या अभिनयानं आणि नृत्यशैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. शाहिद आणि मीरानं 2015मध्ये लग्नगाठ बांधली. या दोघांना जॅन आणि मीशा ही दोन मुलं आहेत. मीरा आणि शाहिद हे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. शाहिद हा सध्या त्याच्या डिजिटल डेब्यूची तयारी करत आहे. फर्जी या अगामी प्रोजेक्टमधून शाहिद प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ज्याचे दिग्दर्शन कृष्णा डीके करणार आहेत. त्याचबरोबर अली अब्बास जफरच्या ब्लडी डॅडीमध्ये देखील शाहिद प्रमुख भूमिका साकारणार आहे. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

 


Source link

Check Also

actor vikram gokhale has passed away vikram gokhale Vikram Gokhale Dealth Live updates Vikram Gokhale Dealth Vikram Gokhale funeral live updates

Vikram Gokhale : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम …

Vikram Gokhale Vikram Gokhale Inherited Acting In His Family Acting Lessons Given By Grandparents

Vikram Gokhale : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन …

In Pics: फुलाफुलांचा भन्नाट ड्रेस! नुसरतच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस

In Pics: फुलाफुलांचा भन्नाट ड्रेस! नुसरतच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस Source link

Leave a Reply

Your email address will not be published.