Scientists Are Close To Re Growing Severed Hands And Feet Of Human Regeneration Of Organs

Regeneration Of Organs : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या (Science and Technology) जोरावर शास्त्रज्ञ पृथ्वीवरच नाही तर अवकाशातही पराक्रम गाजवताना दिसत आहेत. जगभरातील शास्त्रज्ञांकडून विविध गोष्टींवर संशोधन सुरु आहे. येत्या काळात अनेक नवे शोध लागतील. अगदी मानवी शरीर आणि प्राण्यांवरही विविध प्रकारचं संशोधन सुरु आहे. जगात विविध प्रकारचे प्राणी अस्तित्वात आहेत. प्रत्येकाची स्वतःची वेगळी वैशिष्ट्ये आणि क्षमता आहे. काही प्राणी असे आहेत जे त्यांचे कापलेले अंग परत वाढू शकतात. वैज्ञानिक भाषेत यालाच अवयवांचं रिजेनरेशन म्हणजे अवयवांचे पुनरुत्पादन (Regeneration) असं म्हटलं जातं. हरण त्यांची तुटलेली शिंगे पुन्हा वाढू शकते आणि पाल देखील तुटलेली शेपूट पुन्हा वाढवू शकते. पण मानवाकडे अशी क्षमता नाही. 

मानवाचे कापलेले हात आणि पाय पुन्हा वाढवता येणार?

मानवाकडेही कापलेले अवयव पुन्हा नव्या वाढवता येण्याची क्षमता असती तर, याबाबत तुम्ही कधी विचार केला आहे का? एखादी व्यक्ती त्याचे कापलेले हात आणि पाय पुन्हा वाढवू शकली तर, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? सध्याच्या काळात याचं उत्तर ‘नाही’ असं आहे. पण येत्या काळात हेही शक्य होऊ शकतं. होय, शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, मानवमध्ये अशी क्षमता विकसित करता येऊ शकते. मानव हे साध्य करण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे.

शास्त्रज्ञांना करायचा आहे ‘हा’ प्रयोग 

शास्त्रज्ञांना मानवी अवयव पुन्हा वाढवण्यासाठी प्रयोग करण्याची उत्सुकता आहे. शास्त्रज्ञांना मानवी शरीरात हात आणि पाय वाढणाऱ्या पेशी वाढण्याची क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हरणाच्या शरीरात त्याची शिंगे पुन्हा निर्माण करण्यासाठी ब्लास्टेमा पेशी आढळतात. याचा उपयोग करून शास्त्रज्ञ मानवाच्या शरीरातही अशा प्रकारची क्षमता विकसित करण्याची इच्छा आहे. हा रिजेनरेशनचा प्रयोग शास्त्रज्ञांना मानवी शरीरावरही करायचा आहे.

उंदरांवर प्रयोग यशस्वी

सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेला एका रिपोर्टनुसार, रिजेनरेशन उंदरावरील प्रयोग यशस्वी झाला आहे. चीनमधील शियान येथील नॉर्थवेस्टर्न पॉलिटेक्निकल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी हा रिजेनरेशनचा यशस्वी प्रयोग केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शास्त्रज्ञांनी हरणाच्या शरीरात सापडलेल्या ब्लास्टेमा प्रोजेनिटर पेशी उंदराच्या शरीरात सोडल्या. यानंतर 45 दिवसांनी उंदराच्या डोक्यावर शिंगासारखा आकार दिसून आला.

हे तंत्रज्ञान मानवी शरीरावर कसं काम करेल?

हरणांच्या शिंगांचा आणि त्यासाठी आवश्यक पेशींचा शास्त्रज्ञांना खूप सखोल अभ्यास केला. वर्षभर अभ्यास केल्यानंतर शास्त्रज्ञांनी अवयवाची पुन्हा वाढ होण्याची प्रक्रिया समजून घेतली, असं या अभ्यासात सांगण्यात आलं आहे. या संशोधनाद्वारे प्राण्यांप्रमाणेच मानवी अवयवांच्या पुनर्विकासासाठी प्रयत्न केला जाऊ शकतो, असं रिजेनरेशनवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांचं मत आहे. संशोधकांच्या मते, मानवी शरीरात रिजेनरेशन हे शक्य आहे. जेव्हा ब्लास्टेमा पेशी मानवी शरीरात प्रवेश करतील तेव्हा या पेशी आपली हाडे आणि कार्टिलेज पुन्हा तयार करण्याचं काम करु शकतात.

अभ्यासात फक्त हरणांचा समावेश का करण्यात आला?

स्वयं-नूतनीकरण पेशी म्हणजेच रिजेनरेशन करणाऱ्या पेशी अनेक सस्तन प्राण्यांमध्ये आढळतात. उंदरांमध्येही अशा प्रकारच्या पेशी असतात पण हरण हा एकमेव प्राणी आहे जो या पेशींचा चांगला वापर करतो. अभ्यासात असं आढळून आलं की, हरणाचे शिंगे पडू लागताच ब्लास्टेमा पेशी लगेच सक्रिय होतात. शिंग पूर्णपणे गळून पडलं की, नवीन शिंग तयार करण्याचं काम सुरू होतं. यामुळेच संशोधनात हरणांचा वापर करण्यात आला.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Venus Volcano : पृथ्वीला धोका? शुक्र ग्रहावर सक्रिय ज्वालामुखी, नासाने उलगडलं आणखी एक रहस्य


Source link

Check Also

Pakistan Government Official Twitter Account In India Blocked After Legal Demand

Twitter Blocked Pakistan Government: एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरची (Twitter News) मालकी स्विकारल्यापासूनच या-ना …

Moto G13 Launched In India Amazing Features In Low Budget Tech News In Marathi

Moto G13 Launched: Motorola ने आज भारतात नवीन बजेट 4G फोन लॉन्च केला आहे. हा …

Meta Verified Waitlist Opens In India Need To Pay Rs 1,099 To Get Blue Tick On FB Insta Know Details

Meta Verified:  सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरने ब्लू टिकसाठी शुल्क आकारण्यास सुरुवात केल्यानंतर मेटानेदेखील हाच मार्ग …

Leave a Reply

Your email address will not be published.