Richa Chadha And Ali Fazal Wedding Richa And Ali Are Finally Going To Tie The Knot

Richa Chadha And Ali Fazal Wedding : बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा (Richa Chadha) आणि अली फजल (Ali Fazal) गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. एकमेकांना डेट केल्यानंतर रिचा आणि अली अखेर या महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. 

रिचा चढ्ढा आणि अली फजलच्या घरी लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. रिचा आणि अलीचा शाही विवाहसोहळा या महिन्याच्या अखेरीस होणार आहे. रिचा आणि अलीचा पाच दिवस विवाहसोहळा पार पडणार आहे. तर मुंबई आणि दिल्ली दोन्ही ठिकाणी रिसेप्‍शनचं आयोजन करण्यात आलं आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, दिल्लीत रिचा आणि अलीच्या लग्नसोहळ्याला सुरुवात होणार आहे. तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत एका ग्रॅंड रिसेप्‍शनचं आयोजन केलं आहे. रिचा आणि अलीचा संगीत आणि मेहेंदीचा कार्यक्रमदेखील खास असणार आहे. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रिचा-अलीच्या रिसेप्‍शनचं आयोजन करण्यात आलं आहे. 


रिचा आणि अलीच्या लग्नसोहळ्याला 350 ते 400 पाहुणे उपस्थित राहणार आहेत. मागील महिन्यात रिचाने एका मुलाखतीत लग्नासंदर्भात भाष्य केलं होतं. कोरोनामुळे आणि त्यानंतर दोघेही कामात व्यस्त असल्याने त्यांच्या लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली. 

रिचा आणि अली लवकरच ‘फुकरे 3’ मध्ये दिसणार आहेत. 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फुकरे’ या सिनेमातदेखील दोघे महत्त्वाच्या भूमिकेत होते. याच सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दोघांची मैत्री झाली आणि पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 2015 पासून दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. तर 2017 साली दोघींनी त्यांचं नातं अधिकृतरित्या जाहीर केलं. 

संबंधित बातम्या

Richa Chadha-Ali Fazal Wedding: रिचा चढ्ढा आणि अली फजल यांच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, सप्टेंबरमध्ये अडकणार विवाहबंधनात

Body Spray Advertisement : बॉडी स्प्रेच्या वादग्रस्त जाहिरातीवर भडकले सेलिब्रिटी; रिचा, फरहान अन् सोनानं शेअर केलं ट्वीट
Source link

Check Also

Brahmastra Box Office Collection 425 Crore Worldwide Gross In 25 Days Number 1 Hindi Movie Of 2022

Brahmastra Box Office Collection:  बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia …

Richa-Ali Wedding: रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी बांधली लग्नगाठ; पाहा फोटो!

Richa-Ali Wedding: रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी बांधली लग्नगाठ; पाहा फोटो! Source link

Ponniyin Selvan I Box Office Collection Day 4 Movie Cross 250 Crore

Ponniyin Selvan I:  दिग्दर्शक मणिरत्न यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ (Ponniyin Selvan) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ …

Leave a Reply

Your email address will not be published.