Redmi 11 Prime Launched In India, Know Price And Features

Redmi 11 Prime 5G : देशात लवकरच 5G सेवा सुरु होणार आहे. अशातच आता 5G मोबाईलच्या ग्राहकांची संख्या देखील वाढली आहे. सर्वच मोबाईल उत्पादक कंपन्या आपले अपडेटेड 5G मोबाईल बाजारात लॉन्च करत आहेत. अशातच नवीन दमदार 5G स्मार्टफोन Redmi 11 Prime लॉन्च झाला आहे. या फोनमध्ये मजबूत बॅटरी आणि 50MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची किंमत 12,999 रुपयांपासून सुरू होते. हा फोन ग्रीन, पर्पल आणि ब्लॅक कलरमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. फोनवर लॉन्चिंग ऑफरमध्ये 13% सूट आणि ICICI बँकेकडून पेमेंट केल्यावर हजार रुपयांचा त्वरित कॅशबॅक देण्यात येत आहे.

या फोनच्या 4GB आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 15,999 रुपये मोजावे लागतील. हा फोन 13% च्या सवलतीनंतर 13,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. फोनवर ICICI बँकेकडून पेमेंट केल्यावर हजार रुपयांचा झटपट कॅशबॅक आहे. त्यानंतर हा फोन फक्त 12,999 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. फोनवर 10,550 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन 

  • 4GB आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी फोनची किंमत 17,999 रुपये आहे. जी 11% च्या सवलतीनंतर 15,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. फोनवरील बाकीच्या ऑफर्स सारख्याच आहेत.
  • फोनची रॅम बूस्टरने 8GB पर्यंत वाढवता येते आणि स्टोरेज 512GB पर्यंत वाढवता येते.
  • फोनमध्ये 6.58-इंच अॅडाप्टिव्ह सिंक FHD डिस्प्लेसह मोठी स्क्रीन आहे. Redmi 11 प्राइम ड्युअल 5G सिमला सपोर्ट करतो
  • फोनमध्ये 50MP AI ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. ज्यामध्ये मुख्य कॅमेरा 50MP आहे. दुसरा मॅक्रो कॅमेरा आणि तिसरा डेप्थ कॅमेरा आहे.
  • फोनमधील सेल्फी कॅमेरा 8MP चा आहे. फोनच्या कॅमेरामध्ये मूव्ही फ्रेम, शॉर्ट व्हिडिओ, टाइम लॅप्स, पोर्ट्रेट मोड, लँडस्केप आणि नाईट व्हिजन फीचर्स आहेत.
  • फोनमध्ये मोठी 5000mAh बॅटरी आहे आणि हा फोन 22W फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करतो. फोनची बॅटरी 30 दिवस टिकू शकते. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आला आहे.

Disclaimer: ही सर्व माहिती केवळ Amazon च्या वेबसाइटवरून घेतली गेली आहे. वस्तूंशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, तुम्हाला Amazon वर जाऊन संपर्क साधावा लागेल. एबीपी माझा येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफर याची पुष्टी करत नाही.


Source link

Check Also

First EV Under Rs 10 Lakh Launched- Tata Tiago EV- Prices And Details

Tiago EV मध्ये 24kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक देण्यात आले आहे. जे 315 किमी पर्यंतची रेंज …

Instagram Just Quietly Added QR Codes For Posts

Instagram QR Code : मेटा (Meta) कंपनीची मालकी असलेलं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामचं (Instagram) नवं …

Google Pixel 7 Pro Specifications Leak Online  

Google Pixel 7 Pro : गुगल लवकरच भारतासह जागतिक बाजारपेठेत दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार …

Leave a Reply

Your email address will not be published.