Ranveer Singh Bollywood Superstar Ranveer Singh Has Given Special Wishes To A Member Of The Fourth Season Of Bigg Boss Marathi 4

Ranveer Singh On Tejaswini Lonari : ‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व (Bigg Boss Marathi 4) पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. बिग बॉस मराठीचा चाहतावर्ग जगभरात आहे. आता बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंहनेदेखील (Ranveer Singh) चौथ्या पर्वातील सदस्य तेजस्विनी लोणारीला (Tejaswini Lonari) खास शुभेच्छा दिल्या आहेत. 

रणवीरचा व्हिडीओ तेजस्विनीने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर म्हणतो आहे,”तेजू तू बिग बॉसच्या घरात 50 दिवस पूर्ण केले आहेत. तुला खूप खूप शुभेच्छा…महेश सरांनाही माझा नमस्कार…मला तुझी आठवण येते. तू जिंकून आलीस की आपण पार्टी करू”. 


News Reels

व्हिडीओ शेअर करत तेजस्विनीने लिहिलं आहे,”एका उत्साही व्यक्तीकडून दुसऱ्या उत्साही व्यक्तिला शुभेच्छा…हा व्यक्ती दुसरा-तिसरा कोणी नसून आपल्या फॅशन, अभिनयामुळे चर्चेत असणारा अभिनेता रणवीर सिंह आहे…खूप खूप धन्यवाद”. 

बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा अर्धा टप्पा पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता उर्वरीत 50 दिवसांचा खेळ आणखी खडतर होणार आहे. सध्या तेजस्विनी लोणारीला सर्वाधिक पसंती मिळत असून तिच्या खेळाची दखल थेट बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंहने घेतली आहे. 

बिग बॉसच्या घरातील आपले वास्तव्य टिकून ठेवण्यासाठी स्पर्धकांच्या मानसिक, बौध्दीक आणि शारीरिक क्षमतेचा कस लागत असतो, आणि त्यासाठी प्रत्येकजण साम, दाम, दंड आणि भेद याद्वारे शर्थीचा प्रयास करत असतो. मात्र, तेजस्विनीची खेळी एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. तिच्या नम्र आणि सामंजस्य स्वभावामुळे तिने चाहत्यांचे मन तर जिंकलेच पण त्यासोबतच तिला बिगबॉस मराठीच्या माजी स्पर्धकांचादेखील सपोर्ट मिळत आहे. या आधी बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वीची विजेती मेघा धाडे आणि गतवर्षीच्या सीजन 3 चा वाईल्ड कार्ड सदस्य आदिश वैद्य ने तेजस्विनीच्या खेळाचं कौतुक केलं होतं. इतकचं नव्हे तर विकेंडची चावडी असो वा राणी मुंगीचा टास्क असो तेजस्वीनी घरच्या सदस्यांची देखील फेव्हरेट ठरली आहे.

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस’च्या घरात नवा ट्विस्ट; किरण माने सिक्रेट रूममधून घरातील सदस्यांवर लक्ष ठेवणार
Source link

Check Also

actor vikram gokhale has passed away vikram gokhale Vikram Gokhale Dealth Live updates Vikram Gokhale Dealth Vikram Gokhale funeral live updates

Vikram Gokhale : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम …

Vikram Gokhale Vikram Gokhale Inherited Acting In His Family Acting Lessons Given By Grandparents

Vikram Gokhale : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन …

In Pics: फुलाफुलांचा भन्नाट ड्रेस! नुसरतच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस

In Pics: फुलाफुलांचा भन्नाट ड्रेस! नुसरतच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस Source link

Leave a Reply

Your email address will not be published.