Priyanka Chopra Share Video Of New York Event Desi Girl Enjoys Pani Puri

Priyanka Chopra : प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही विशेष ओळख निर्माण केली आहे. प्रियांकाला अनेक जण ग्लोबल स्टार देखील म्हणतात. प्रियांका ही सध्या न्यूयॉर्कच्या विविध इव्हेंट्समध्ये सहभाग घेत आहे. प्रियांकानं नुकत्याच एका इव्हेंटमध्ये हजेरी लावली. या इव्हेंटमधील व्हिडीओ प्रियांतानं शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रियांकासोबत नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफझाई देखील दिसत आहे. प्रियांकानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती पाणीपुरी खाताना दिसत आहे. 

व्हिडीओमध्ये  प्रियांका ही ब्लॅक बॅकलेस आऊटफिटमध्ये दिसत आहे. तिच्या लूकनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. प्रियांका आणि तिचा पती निक जोनस या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. प्रियांकानं शेअर केलेल्या व्हिडीओला तिच्या चाहत्यांची पसंती मिळाली आहे. या व्हिडीओला प्रियांकानं कॅप्शन दिलं, ‘माझ्या आवडत्या लोकांसोबत न्युयॉर्कमध्ये…’

पाहा व्हिडीओ: 


प्रियांकानं सोमवारी (19 सप्टेंबर) न्यूयॉर्कमधील एका कार्यक्रमामध्ये लहान मुलांच्या हक्काबाबत चर्चा केली.  2016 मध्ये प्रियांका ग्लोबल यूनिसेफ गुडविल अँबेसडर झाली. प्रियांकाची सिटाडेल ही वेब सीरिज अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये ‘गेम ऑफ थ्रोन्स’मधील अभिनेता रिचर्ड मॅडन प्रमुख भूमिका साकारणार आहेत. ही एक सायन्स फिक्शन सीरिज आहे. तसेच प्रियांका ही ‘जी ले जरा’या चित्रपटामधून देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहान अख्तर करणार आहे. तसेच कतरिना कॅफ आणि आलिया भट या अभिनेत्री या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Priyanka Chopra : संयुक्त राष्ट्र महासभेत प्रियांका चोप्राचं भाषण; म्हणाली ‘जगात सर्वकाही ठीक चाललेलं नाही!’
Source link

Check Also

Gandhi Jayanti Mahatma Gandhi Birth Anniversary Bollywood Actors Who Played The Gandhi In Films

मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 2 ऑक्टोबर रोजी जयंती. त्यानिमित्ताने देशभर गांधीजींचं स्मरण केलं जातंय. …

PHOTO : बेन किंग्जले ते नसरुद्दीन शाह… या अभिनेत्यांनी साकारले 'गांधी'

PHOTO : बेन किंग्जले ते नसरुद्दीन शाह… या अभिनेत्यांनी साकारले 'गांधी' Source link

Majha Katta Youths Need To Take Initiative To Experiment With Dramas Like Mahanirvan And Begham Barve Said Satish Alekar On Majha Katta

Satish Alekar On Majha Katta : ‘महानिर्वाण’ या लोकप्रिय नाटकाचे वेगवेगळ्या भाषेत प्रयोग होतात. पण …

Leave a Reply

Your email address will not be published.