Prem Mhanje Kay Asat Movie Suraj Mane Inspirational Story

Prem Mhanje Kay Asat : सातारा जिल्ह्यातील सुरज माने ‘प्रेम म्हणजे काय असतं’ (Prem Mhanje Kay Asat) या चित्रपटातून पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे, पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या या तरुणानं चित्रपटात अभिनेता होण्यापर्यंतचा स्वप्नवत प्रवास साध्य केला आहे. ‘प्रेम म्हणजे काय असतं’ हा चित्रपट 4 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

तख्त प्रॉडक्शन यांनी प्रेम म्हणजे काय असतं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर प्रसाद दत्तात्रय इंगवले यांनी चित्रपटाचं लेखन,  दिग्दर्शन आणि निर्मिती अशी तिहेरी जबाबदारी निभावली आहे. प्रेम ही संकल्पना अत्यंत वेगळ्या पद्धतीने या चित्रपटात मांडण्यात आली आहे. या चित्रपटात सुरज नायकाच्या मित्राच्या भूमिकेत दिसणार आहे. 

कोण आहे सुरज माने? 

साताऱ्याच्या जवळच एका खेड्यात राहणारा सुरज घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यानं तो पेट्रोल पंपावर काम करू लागला. सुरजच्या लहानपणीतच त्याच्या वडिलांचं निधन झालं, तर आई शेतमजुरी करते. चित्रपटाची आवड आणि चित्रपटात काम करण्याविषयी सुरज म्हणाला, ‘चित्रपटांची लहानपणापासूनच आवड होती. अनेक चित्रपट पाहिले, नाटकांत, वेब मालिकांमध्ये काम केले. प्रेम म्हणजे काय असतं हा माझा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटातून मला खूप शिकायला मिळालं. आता अभिनयातच करिअर करायची इच्छा आहे. त्यामुळे आता पुढे जाण्यासाठी आणखी काम करण्याचा मानस आहे. 

नवोदित कलाकारांना संधी

साताऱ्याच्या तख्त प्रॉडक्शनने “प्रेम म्हणजे काय असतं” या त्याच्या पहिल्यावहिल्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रसाद दत्तात्रय इंगवले यांनी चित्रपटाचं लेखन,  दिग्दर्शन आणि निर्मिती अशी तिहेरी जबाबदारी निभावली आहे. प्रेम ही संकल्पना अत्यंत वेगळ्या पद्धतीने या चित्रपटात मांडण्यात आली आहे. प्रेम या संकल्पनेवर आजवर अनेक चित्रपट झाले. मात्र याच संकल्पनेचा आणखी एक वेगळा पैलू “प्रेम म्हणजे काय असतं” या चित्रपटातून मांडला जाणार आहे. नवोदित कलाकारांना या चित्रपटातून संधी देण्यात आली आहे.

 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 


Source link

Check Also

Gandhi Jayanti 2022 The Only Hindi Film Mohandas Karamchand Gandhi AKA Mahatma Gandhi Watched Was Ram Rajya

Gandhi Jayanti 2022 : आज 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची जयंती …

Gandhi Jayanti Mahatma Gandhi Birth Anniversary Bollywood Actors Who Played The Gandhi In Films

मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 2 ऑक्टोबर रोजी जयंती. त्यानिमित्ताने देशभर गांधीजींचं स्मरण केलं जातंय. …

PHOTO : बेन किंग्जले ते नसरुद्दीन शाह… या अभिनेत्यांनी साकारले 'गांधी'

PHOTO : बेन किंग्जले ते नसरुद्दीन शाह… या अभिनेत्यांनी साकारले 'गांधी' Source link

Leave a Reply

Your email address will not be published.