Palghars Rudraksh Patil Brilliant Performance As He Selected For Indian Team In 10m Rifle Shooting To Play In World Championships

Rudraksh Patil : महाराष्ट्राचा सुपुत्र रुद्राक्ष पाटील याने (Rudraksh Patil) याने ऑलिम्पियन ऐश्वर्या प्रतापसिंग तोमर हिला  16-6 च्या फरकाने मात देत एमपी स्टेट नेमबाजी अकादमी श्रेणीतील 10 मीटर एअर रायफल T6 राष्ट्रीय नेमबाजी निवड चाचणी जिंकली आहे.  रुद्राक्ष आणि ऐश्वर्या यांनी आठ जणांच्या उपांत्य फेरीत अनुक्रमे 261.9 आणि 261.3 गुणांसह पहिले आणि दुसरे स्थान पटकावले. त्यापूर्वी, 392-मजबूत पात्रता झोनमध्ये, रुद्राक्षने 630.2 गुण मिळवून एअर आर्मीच्या रवी कुमारच्या मागोमाग दुसरे स्थान पटकावले. रवीने 630.7 गुणांनी फेरी जिंकली तर ऐश्वर्या यावेळी 629.4 गुणांसह चौथ्या स्थानावर राहिली.

याशिवाय राजस्थानच्या यशवर्धन यानेही कमाल कामगिरी केली. रुद्राक्ष पाठोपाठ त्यानेही चमकदार खेळ दाखवला. ज्युनियर पुरुष आणि युवा पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल T6 चाचण् यशवर्धनने जिंकल्या. ज्युनियर पुरुष स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्याने रुद्राक्षचा 17-7 सा पराभव केला, तर युवा वर्गात त्याने आंध्रप्रदेशच्या मद्दिनी उमामहेशचा 17-15 असा पराभव केला.  दिल्लीतील डॉ. करणी सिंह शूटिंग रेंजमध्ये, हरियाणाच्या कशिश मेहराने पुरुषांच्या 25 मीटर सेंटर फायर पिस्तूल T5 ट्रायलमध्ये एकूण 587 गुणांसह विजय मिळवला.

हे देखील वाचा- 


Source link

Check Also

India Legends vs Australia Legends, Semi-final 1 Highlights: Naman Ojha, Irfan Pathan guide INDL to 5-wicket win

India Legends Squad Playing: Naman Ojha (wk), Sachin Tendulkar (c), Suresh Raina, Yuvraj Singh, Yusuf …

Shoaib Akhtar’s Year-old ‘Bumrah’s Back Will Break Down’ Video Goes Viral After India Pacer Ruled Out Of T20 World Cup

Shoaib Akhtar on Jasprit Bumrah: ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसलाय. पीटीआय …

Pakistan fast bowler Naseem Shah tests positive for COVID-19

Pakistan fast bowler Naseem Shah has tested positive for COVID-19 and will miss the remaining …

Leave a Reply

Your email address will not be published.