PAK vs SL Asia Cup Final 2022 LIVE Score Winner Team Champion Match Highlights Pakistan vs Sri Lanka Final Match Dubai International Stadium

PAK vs SL, Asia Cup 2022 Final: दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Dubai International Stadium)  श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात आज आशिया चषकातील अंतिम सामना खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. तर, यापूर्वी अर्धातास 7.00 वाजता नाणेफेक होईल. या सामन्यात आशिया चषक 2022 स्पर्धेचा नवा चॅम्पियन कोण? हे जवळपास निश्चित होणार आहे. यापू्र्वी आशिया चषक विजेत्यांच्या यादीवर एक नजर टाकुयात.

पाकिस्तानसमोर श्रीलंकेचं आव्हान
श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्याता खेळण्यात आलेल्या आशिया चषकातील सुपर 4 फेरीतील अंतिम सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. या सामन्यात पाकिस्ताननं सुरुवातीला फलंदाजी करत श्रीलंकेसमोर 122 धावांचं आव्हान ठेवलं होतं. प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या संघानं पाच विकेट्स राखून विजय मिळवला. श्रीलंकेकडून  पाथुम निसांका, भानुका राजपक्षे तसेच दासून शनाका यांनी संयमी फलंदाजी केली. ज्यामुळं श्रीलंकेला विजयापर्यंत पोहोचता आलं. 

कधी, कुठं पाहायचा सामना?
श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आज 11 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. तर, या सामन्याच्या अर्धातास पूर्वी नाणेफेक होईल. श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील लाईव्ह सामना डीडी स्पोर्ट्स आणि स्टार स्पोर्ट्सवर पाहता येणार आहे.या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार पाहता येणार आहे. याशिवाय आशिया चषकाच्या संबंधित बातम्या जाणून घेण्यासाठी https://marathi.abplive.com वर भेट देऊ शकतात.

श्रीलंका-पाकिस्तान यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड
श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 22 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले गेले. यातील 13 सामन्यात पाकिस्तानच्या संघानं विजय मिळवलाय. तर, 9 सामने श्रीलंकानं जिंकले आहेत. पण गेल्या 5 सामन्यांबद्दल बोलायचं झाले तर श्रीलंका अधिक प्रभावी ठरलाय. श्रीलंकेनं गेल्या 5 पैकी 4 सामने जिंकले आहेत.

संघ-

श्रीलंका:
दसुन शनाका (कर्णधार), दनुष्का गुणथिलका, पथुम निसंका, कुसल मेंडिस, चरित असलंका, भानुका राजपक्षे, आशेन बंडारा, धनंजया डी सिल्वा, वानंदु हसरंगा, महेश थीक्षणा, जेफरी वेंडरसे, प्रवीण जयविक्रमा, चमिका करुणारत्ने, दिलशान पथिराना, नुवानीडु फर्नांडो, नुवान तुषारा, दिनेश चांदीमल.

पाकिस्तान:
बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहनवाज दहानी, उस्मान कादिर, मोहम्मद हसनैन.

हे देखील वाचा-


Source link

Check Also

It’s difficult to defend when Surya attacks bowlers: Parnell

Suryakumar Yadav’s incredibly strong and powerful batting has made him one of the most feared …

Former Pakistan Cricketer Kamran Akmal Compares Arshdeep Singh With Zaheer Khan 

Arshdeep Singh in Team India : डावखुरा युवा गोलंदाज अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) याने आयपीएल …

India remain static on 4th in ODI and T20I ranking after annual update

India have maintained their fourth spot in the ICC women’s ODI and T20I team rankings …

Leave a Reply

Your email address will not be published.