Nothing Phone 2 Challege To Iphone Mobile These Are Amazing Features Available In Mobile And Ceo Carl Pei Reveals Launch Timeline Tech News Marathi

Nothing Phone 2 : सध्या अनेक मोबाईल कंपन्यांकडून बाजारात नवनवीन फिचर्ससोबत आपला स्मार्टफोन लाँच करत आहेत. साधारण एक वर्षापूर्वी मोबाईल निर्माती कंपनी नथिंगकडून ‘ट्रान्सपरंट मोबाईल नथिंग फोन 1 लाँच केला होता. आता या सिरीजचा नथिंग फोन – 2 (Nothing Phone 2) च्या नवीन व्हर्जनविषयी सोशल मीडियीवर माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसापासून या नवीन व्हर्जनबद्दल अनेक प्रकारच्या चर्चा केल्या जात आहेत. या मोबाईलच्या लाँचिंगच्या तारखेपासून ते  फिचरपर्यंत सोशल मीडियावर माहिती लिंक झाली आहे.  रिपोर्टनुसार, कंपनीचे CEO Carl Pei  यांनी एक  वक्तव्य केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, आमचा मोबाईल सरळ आयफोनशी टक्कर देणार आहे. या फोनकडे आम्ही आयफोनचा अल्टरनेटिव्ह मोबाईल म्हणून पाहतो आहोत. असं आश्चर्यचकित वक्तव्य केलं आहे. या नवीन फोनच्या नवीन व्हर्जनविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया…

Nothing Phone 2  च्या फिचर्सविषयी 

हा नवीन Nothing Phone 2  सुद्धा Nothing Phone 1 सारखाच ट्रान्सपरंट डिझाईनमध्ये उपलब्ध होणार आहे. फोर्ब्सच्या दिलेल्या मुलाखतमध्ये सीईओ  Pei यांनी सांगितल्यानुसार,   Nothing Phone 2  मध्ये 4,700mah इतक्या क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. हा मोबाईल Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरवर काम करणार आहे. हा मोबाईल 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरजसह उपलब्ध होऊ शकतो.

Nothing Phone 2 आयफोनला टक्कर देऊ शकेल का?

कंपनीचे सीईओ Pei यांचं म्हणणे आहे की,  अमेरिकेसारख्या बाजारपेठेत  आयफोनचा स्पर्धक म्हणून Nothing Phone 2  जवळ चांगली संधी आहे.  त्यांनी सांगितले की,’याआधी  आम्ही Nothing Phone 1 या मोबाईलला काही मोजक्या बाजारपेठेत लाँच केलं होतं. या मोबाईलमुळे काही बाजारापेठांमध्ये आयफोनला सोडलेल्या युजर्सकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं आहे. अमेरिकन बाजारपेठेवर अॅपलच्या ब्रँडची सर्वाधिक मक्तेदारी आहे. याला पर्याय शोधू पाहणाऱ्या लोकांना खरे तर कोणताही पर्याय मिळत नाही. पण आता Nothing Phone 2  स्मार्टफोनसाठी चांगला पर्याय आहे.’

कधी लाँच होणार Nothing Phone 2 

जुलै 2023 मध्ये Nothing Phone 2  मोबाईलची लाँचिग करण्यात येणार आहे.  कंपनीच्या सीईओकडून फोर्ब्सला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की,  जागतिक बाजारपेठेत नथिंग फोनच्या सिरीजमधील सेकंड जनरेशनचा  Nothing Phone 2 जुलै महिन्यात लाँच करण्यात येईल. गेल्या वर्षी भारतात नथिंग फोन -1 लाँच करण्यात आला होता. त्यावेळी फोनची किंमत 32,999 रूपये इतकी होती. आता Nothing Phone 2 फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असून फोनची किंमत 29,999  रूपये इतकी आहे. 

जून महिन्यात  लाँच होईल iQOO Neo 7 Pro

जून महिन्यातील अंतिम आठवड्यापर्यंत  भारतात iQOO Neo 7 Pro  मोबाईल लाँच करण्यात होऊ शकतो. या फोनमध्ये Nothing Phone 2 सारखाच प्रोसेसर देण्यात येणार आहे. या मोबाईलची बॅटरी क्षमता 5,000mah इतकी देण्यात आली आणि 120 वॅटचा चार्जिंग सपोर्ट उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

 


Source link

Check Also

New Malware DogeRAT Remote Access Trojan Spreading Through Fake Android Apps Know How To Be Safe Detail Marathi News

DogeRAT Malware:  DogerAT (रिमोट ऍक्सेस ट्रोजन) या नव्या व्हायरसचा शोध संशोधकांनी लावला असून बनावट अॅप्सच्या …

Samsung Galaxy F54 5G India Launch Date Confirmed Officially Expect Price Features Samsung Galaxy F54 5G Pre Booking

Samsung Galaxy F54 5G मध्ये कंपनी Galaxy M54 5G स्मार्टफोन प्रमाणेच स्पेसिफिकेशन आणि फिचर्स देऊ …

Iphone 15 And 15 Pro Will Soon Launch In India Iphone 15 Price Launch Date Charging Feature Detail Marathi News

iPhone 15 series: आताच्या तरुण पिढीमध्ये आयफोनचे (Iphone) युजर्स अधिक आहेत जे आयफोनच्या नव्या सीरिजची …

Leave a Reply

Your email address will not be published.