New Features Of Microsoft Window 11 Tech News Marathi

Window 11 new Features :  मायक्रोसॉफ्ट बिल्ड 2023 च्या वार्षिक परिषदेत मायक्रोसॉफ्टने विंडो 11 च्या (Microsoft Window 11 new Features) युजर्ससाठी नवीन फिचर्स लाँच केले आहेत. यामध्ये सर्वात जास्त लक्षवेधी फिचर Windows Copilot आहे.  हे नवीन फिचर युजर्सना कॉम्प्युटरच्या होमस्क्रीनवर आर्टिफिशयल इंटिलिजेन्स (AI) सपोर्टेड  असणार आहे. याशिवाय कंपनीने अनेक नवीन रिचर्स लाँच केली आहेत. यातील काही फिचर्स युजर्सना उपलब्धही करून देण्यात आले आहेत. याआधी फेब्रुवारी महिन्यात कंपनीने एआय (AI) पावर्ड  Bing सर्च इंजिनची सुविधा दिली होती. हे सर्च इंजिन टास्कबारमध्ये उपलब्ध करून देण्यात आले होते. यामध्ये आता मायक्रोसॉफ्टने आणखीन नवीन फिचर्स जोडली आहेत. या फिचर्सबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया…

जाणून घ्या विंडोज 11 मधील नवीन फिचर्सविषयी
 

1. युजर्सच्या प्रायव्हसीची घेण्यात आली काळजी

मायक्रोसॉफ्ट कंपनीने म्हटले की,  24 मे पासून  विंडोज 11 च्या युजर्ससाठी प्रायव्हसी सेटिंगसाठी एक अॅप दिला आहे. यामुळे युजर्सना आपल्या माहितीला उपलब्ध सेंसरपर्यंत ब्लॉक किंवा अलाऊ करण्याची सुविधा मिळणार आहे. यामध्ये युजर्सना वॅक ऑन अॅप्रोच, लॉक ऑन लिव्ह या फिचर्सना enable किंवा disable पर्याय निवडण्याची सुविधा दिली आहे. यामुळे तुमची प्रायव्हसी अधिक सुरक्षित राहण्यास मदत  मिळणार आहे.

2. VPN अॅक्सेस फिचर 

मायक्रोसॉफ्टने  Glanceable VPN या नावाचे फिचर विंडोज 11 च्या टास्कबारमध्ये जोडले आहे. या नवीन फिचरमुळे युजर्सना VPN स्टेटस तपासणे सोपं होणार आहे. जर तुमचा कॉम्प्युटर नेटवर्कशी जोडलेला असेल तर नेटवर्कच्या वरती टास्कबारवर एक आयकॉन दिसून येईल. हे नवीन फिचर्सही लोकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी  युजर्सना क्विक सेटिंगमध्ये जाऊन   VPN चा पर्याय निवडून ऑन किंवा ऑफ करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

3. अकाउंट बॅजिंग फिचर 

जून महिन्यापासून सर्व युजर्सना विंडोज 11  मध्ये अकाउंट बॅजिंग हे नवीन फिचर मिळणार आहे. हे फिचर स्टार्ट मेन्यूमध्ये उपलब्ध आहे. हे फिचर तेव्हाच सुचना देईल जेव्हा युजर्सच्या कॉम्प्युटर सिस्टीममध्ये काही समस्या असेल. याचा अर्थ तुमची सिस्टीम सुरक्षित नसेल, तर हे फिचर सावध होण्याची सुचना देते.  

4. लाईव्ह कॅप्शन फिचर 

कंपनीने मायक्रोसॉफ्टच्या युजर्ससाठी  विंडोज 11 मध्ये लाईव्ह कॅप्शन्स हे नवीन फिचर दिले आहे. सुरूवातील लाईव्ह कॅप्शन्स  फक्त इंग्रजी भाषेत होतं. पण आता हे फिचर 10 भाषेत उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये  चिनी भाषा, डॅनिश, इंग्रजी (भारत, ऑस्टेलिया, कॅनडा,  न्यूझीलंड, युके, संयुक्त राज्य ) फ्रेंच ( कॅनाडा, फांस ), जर्मन,  इटालियन,  जापानी, कोरिया, पोर्तुगाली आणि स्पॅनिश  इत्यादी भाषांचा समावेश आहे.

 

5. ब्लूटूथ  लो एनर्जी सपोर्ट फिचर

मायक्रोसॉफ्ट विंडोज 11 मध्ये कॉम्प्युटरच्या स्टिस्टीमसाठी ‘ब्लूटूथ लो एनर्जी ऑडिओ सपोर्ट’फिचर उपलब्ध  करून देणार आहे. यासाठी कंपनीने  सॅमसंग गॅलेक्सी आणि इंटेल या कंपन्यांसोबत पार्टनरशिप केली आहे. यामुळे युजर्सना चांगल्या गुणत्तेच्या ऑडिओची सुविधा मिळणार आहे. ब्लूटूथ लो एनर्जी ऑडिओ सपोर्ट फिचरमुळे गॅलेक्सी बड्स 2 प्रो हे वायरलेस ईअर बड्ससहित इतर मोबाईलवर कॉलिंगचा अनुभव चांगला होणार आहे. या फिचरमुळे युजर्सना व्हिडीओ आणि ऑडिओ संगीताचा चांगला अनुभव मिळणार आहे. कंपनीने सांगितले आहे की, ‘आम्ही या नवीन सुविधा आणि भविष्यातील संभाव्य शक्यतांच्या बाबतीत उत्सुक आहोत. याचं कारण ब्लूटूथ LE ऑडिओ अनेक डिव्हाईसेसमध्ये वापरले जात आहे.’    

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

AI Face-Swapping : AI चा वापरून 5 कोटींची फसवणूक! मित्राला मदत म्हणून पाठवले 5 कोटी, फेस स्वॅपिंग करून कोट्यवधींचा गंडा


Source link

Check Also

New Malware DogeRAT Remote Access Trojan Spreading Through Fake Android Apps Know How To Be Safe Detail Marathi News

DogeRAT Malware:  DogerAT (रिमोट ऍक्सेस ट्रोजन) या नव्या व्हायरसचा शोध संशोधकांनी लावला असून बनावट अॅप्सच्या …

Samsung Galaxy F54 5G India Launch Date Confirmed Officially Expect Price Features Samsung Galaxy F54 5G Pre Booking

Samsung Galaxy F54 5G मध्ये कंपनी Galaxy M54 5G स्मार्टफोन प्रमाणेच स्पेसिफिकेशन आणि फिचर्स देऊ …

Iphone 15 And 15 Pro Will Soon Launch In India Iphone 15 Price Launch Date Charging Feature Detail Marathi News

iPhone 15 series: आताच्या तरुण पिढीमध्ये आयफोनचे (Iphone) युजर्स अधिक आहेत जे आयफोनच्या नव्या सीरिजची …

Leave a Reply

Your email address will not be published.