Navratri Recipe Best In Taste And Taste Know The Recipe For Making Khamang Dhokla For Fasting

Upvasacha Dhokla Recipe : गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवाची सर्वजण वाट पाहत आहेत. नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या 26 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. नवरात्रोत्सवात अनेक मंडळी उपवास करतात. या दिवसांत हलका-फुलका आहार घेणं गरजेचं आहे. तर आज जाणून घ्या उपवासाचा खमंग ढोकळा (Upvasacha Dhokla Recipe) बनवण्याची रेसिपी…

‘उपवासाचा खमंग ढोकळा’ बनवण्यासाठी लागणारे साहित्य – 

  • वरीचे पीठ – 1 कप
  • साबुदाणा – 1.4 कप पूड
  • दही – 1.2 कप
  • पाणी – 1.2 कप
  • बेकिंग सोडा – 1.2 चमचा
  • सैंधव मीठ – 1 चमचा
  • जिरे – 1 चमचा
  • लिंबाचा रस – 1.2 चमचा
  • कोथिंबीरीची पाने – 1 चमचा
  • हिरव्या मिरच्या – आवश्यकतेनुसार

‘उपवासाचा खमंग ढोकळा’ बनवण्याची कृती – 

– एका वाटीत 1 कप वरीच्या तांदळाचे पाठी, साबुदाणा पावडर, दही, चवीनुसार सैंधव मीठ, आणि आवश्यकतेनुसार हिरव्या मिरच्या चिरुन त्यात पाणी घालून ते छान मिक्स करा. 

– तयार झालेलं मिश्रण 5 ते 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवा. 

– एका प्लेटला तेल लावून तयार झालेलं मिश्रण त्यामध्ये ओता. 

– मिश्रण सर्वत्र एकसमान पसरुन घ्या. 

– आता एका पॅनमध्ये दोन ग्लास पाणी उकळवून घ्या.

– आता त्या पॅनवर ढोकळ्याचं मिश्रण ओतलेली डिश ठेवा आणि पॅनवर झाकण ठेवा.

– हे मिश्रण 10 ते 15 मिनिटे वाफेवर शिजत ठेवा.

– त्याचवेळी बाजूला दुसरा एक पॅन घेऊन त्यामध्ये तेल गरम करा.

– गरम तेलामध्ये जीरे आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून चांगलं परतून घ्या.

– ढोकळ्याला आपल्या आवडीच्या आकारात कट करा आणि हिरव्या मिरच्या आणि जिऱ्याच्या फोडणीने गार्निशिंग करा.

– तयार झालेल्या खमंग ढोकळ्याचा चटणीसोबत आस्वाद घ्या. 

उपवास करताना काय काळजी घ्यावी?

– नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी कामाशिवाय प्रवास करणे टाळावे. 

– आजारी असल्यास उपवास करणे टाळावे. 

– गरोदर महिलेने वैद्यकीय सल्ला घेऊन उपवासाबाबतचा निर्णय घ्यावा. 

– उपवासादरम्यान फळे आणि दुधाचं सेवन करावं.
 
– आपल्या क्षमतेचा विचार करुन उपवास करण्याचा निर्णय घ्यावा.

– उपवास करताना योग्य आहार घेणं गरजेचं आहे.  

संबंधित बातम्या

Navratri Recipe : उपवासाला खिचडी खाऊन कंटाळलात? ‘हा’ डोसा एकदा ट्राय कराच, पाहा सोपी रेसिपी

Navratri Recipe : खुसखुशीत साबुदाण्याचे थालीपीठ बनवण्याची रेसिपी जाणून घ्या…


Source link

Check Also

Benefits Of Raisins : भिजवलेल्या मनुक्याचे अनेक गुणकारी फायदे

Benefits Of Raisins : भिजवलेल्या मनुक्याचे अनेक गुणकारी फायदे Source link

Hair Care Tips How To Increase Hair Volume Naturally Marathi News

Hair Care Tips : स्त्री असो किंवा पुरुष प्रत्येकालाच आपले केस (Hair) प्रिय असतात. केस …

5 ways to walk to slow down ageing and stay young

Walking is the most basic, but important way to stay fit. But most of us …

Leave a Reply

Your email address will not be published.