National Cinema Day 2022 How To Book Movie Tickets Online For Rs 75 Cinema Day

National Cinema Day 2022:  मल्टीप्लेक्स ऑफ इंडियानं (MAI) एक मोठा निर्णय घेतला आहे. मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियानं ट्विटरवर एक ट्वीट करुन माहिती दिली की, ‘राष्ट्रीय चित्रपट दिवस’ (National Cinema Day) हा  23 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी चित्रपटप्रेमींना 75 रुपयांमध्ये चित्रपट पाहता येणार आहे. पीवीआर, आयनॉक्स, सिनेपोलिस, कार्निवल, मिराज आणि सिटी प्राइड, एशियन, मुक्ता ए 2, मूवीटाइम, वेव, एम 2 के आणि डिलाइट या देशभरातील मल्टीप्लेक्समध्ये ‘राष्ट्रीय चित्रपट दिनी’ प्रेक्षक 75 रुपयांमध्ये चित्रपट पाहू शकणार आहेत. 75 रुपयांमध्ये चित्रपट पाहण्यासाठी तिकीट कसं बुक करायचं? तिकीट हे ऑनलाइन पद्धतीनं बुक करायचं की ऑफलाइन? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. तर 75 रुपयांमध्ये तिकीट बुक करण्याची सोपी पद्धत जाणून घेऊयात….

राष्ट्रीय चित्रपट दिनी 75 रुपयांमध्ये चित्रपट पाहण्यासाठी ऑनलाइन पद्धतीनं तिकीट बुक करायचं असेल तर तुम्ही या सोप्या स्टेप्स फॉलो करु शकता- 

स्टेप 1:  सर्वप्रथम पीवीआर, आयनॉक्स, सिनेपोलिस या वेबसाइट्स ऑपन करा. 
स्टेप 2: त्या साइट्सवर लॉग-इन करा. 
स्टेप 3: त्यानंतर सिटी आणि एरिरा सिलेक्ट करुन थिएटर निवडा.
स्टेप 4: जो चित्रपट बघायचा आहे, तो सिलेक्ट करा. 
स्टेप 5 : त्यानंतर सर्वात शेवटी वेळ सिलेक्ट करा. वेळ सिलेक्ट केल्यानंतर ऑनलाइन पेमेंट करुन प्रोसेस पूर्ण करा. त्यानंतर तुमचं तिकीट बुक होईल. 

जर थर्ड पार्टी अॅपमधून तिकीट बुक केले तर जास्त पैसे भरावे लागतील. बुक माय शो सारख्या प्लॅटफॉर्मवरुन तिकीट बुक केल्यानंतर देखील अॅडशनल चार्जेस भरावे लागतील.  कारण या अॅपमधून तिकीट बुक करताना तुम्हाला जीएसटी आणि इंटरनेट चार्ज भरावा लागतो. 

‘केजीएफ चॅप्टर 2’, ‘आरआरआर’, ‘विक्रम’ हे दाक्षिणात्य चित्रपट, ‘भूल भुलैया 2′ हा बॉलिवूड चित्रपट आणि डॉक्टर स्ट्रेंज आणि टॉप गन : मेवरिक’ हे हॉलिवूड चित्रपट सिनेप्रेमींना 75 रुपयांमध्ये बघता येणार आहेत. त्यामुळे आता प्रेक्षक राष्ट्रीय चित्रपट दिनाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.   गेल्या काही दिवसांत या सिनेमांनी सिनेमागृहात धुमाकूळ घालत बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला आहे. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 

National Cinema Day : 16 सप्टेंबर नाही तर ‘या’ दिवशी साजरा होणार ‘राष्ट्रीय चित्रपट दिवस’; 75 रुपयांमध्ये पाहा चित्रपट


Source link

Check Also

Brahmastra Box Office Collection 425 Crore Worldwide Gross In 25 Days Number 1 Hindi Movie Of 2022

Brahmastra Box Office Collection:  बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia …

Richa-Ali Wedding: रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी बांधली लग्नगाठ; पाहा फोटो!

Richa-Ali Wedding: रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी बांधली लग्नगाठ; पाहा फोटो! Source link

Ponniyin Selvan I Box Office Collection Day 4 Movie Cross 250 Crore

Ponniyin Selvan I:  दिग्दर्शक मणिरत्न यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ (Ponniyin Selvan) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ …

Leave a Reply

Your email address will not be published.