Most Expensive Spice General Knowledge Marathi News Know Which Is Most Expensive Spice In The World

Most Expensive Spice : जेवणात मसाला (Spices) नसेल तर चवीत काहीतरी अपूर्ण वाटते. मसाल्या टाकल्याशिवाय एखाद्या पदार्थाची चव कमीच वाटते. कारण चाट असो की आपल्या स्वयंपाकघरात बनवलेली भाजी (Vegetables), त्यात मसाले घातले नाहीत तर तोंडाला चव येत नाही. जर त्याच मसाल्यांबद्दल बोलायचं झालं तर आजकाल आपल्याला बाजारात सर्व प्रकारचे मसाले मिळतात. आपल्या देशात अनेक प्रकारचे मसालेही उपलब्ध आहेत. पण तुम्हाला माहित आहे का? जगातील सर्वात महागडा मसाला कोणता आहे? नसेल तर आज जाणून घ्या की, जगातील सर्वात महागडा मसाला कोणता आहे? आणि कुठे उपलब्ध आहे?

‘हा’ जगातील सर्वात महागडा
जगातील सर्वात महागड्या मसाल्याचे नाव रेड गोल्ड आहे. ज्याप्रमाणे या मसाल्याचे नाव ‘रेड गोल्ड’ आहे, त्याचप्रमाणे मसाल्याचा हा पदार्थ सोन्याच्या दराने विकला जातो. जगात आढळणाऱ्या मसाल्यांमध्ये सर्वात जास्त किंमत ‘रेड गोल्ड’ या मसाल्याची आहे. या मसाल्याला ‘केशर’ म्हणतात. रेड गोल्ड नावाचा हा मसाला सर्वात महाग आहे. जर तुम्ही केसर एक किलोग्रॅमसाठी घेतले, तर त्याची किंमत 2.5 लाख ते 3 लाख रुपयांपर्यंत आहे. आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच येत असेल की या मसाल्यात असे काय आहे? की हा जगातील सर्वात महागडा आहे.

याच्या उच्च किंमतीचे काय कारण आहे?

या मसाल्याच्या उच्च किंमतीचे एक विशेष कारण म्हणजे ‘केशर’ वनस्पती जगातील सर्वात महाग वनस्पती असल्याचे सांगितले जाते. धक्कादायक बाब म्हणजे याच्या एका फुलातून फक्त तीन केशरच्या काड्या सापडतात. केशर खूप महाग आहे, तसेच केशर हे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते हे सर्वांनाच माहीत आहे. यामुळेच हा जगातील सर्वात महागडा मसाला आहे. केशरचा वापर आयुर्वेदिक पाककृतींमध्ये, खाद्यपदार्थांमध्ये आणि देवांच्या पूजेमध्ये केला जात असला तरी, आता लोकांनी पान मसाला आणि बाहेर विकल्या जाणार्‍या गुटख्यामध्ये त्याचा वापर सुरू केला आहे. केशर हे रक्त शुद्ध करणारे, कमी रक्तदाबासाठी उपाय आणि खोकला शमन करणारे देखील मानले जाते. या कारणामुळे, औषधी वनस्पती म्हणूनही याचा वापर केला जातो.

News Reels

 

महत्वाच्या बातम्या : 

Drinking Water : सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिणे शरीरासाठी फायदेशीर की घातक? वाचा संशोधनात काय म्हटलंय

 

 

 

 

 


Source link

Check Also

Health Tips | Health Tips : चांगल्या दृष्टीपासून ते निरोगी त्वचेपर्यंत असे आहेत ब्रोकोलीचे फायदे

ब्रोकोलीमध्ये बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन ए, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन सी आणि ई भरपूर प्रमाणात …

Health Tips : थायरॉइड झाल्यावर चहाचं सेवन करावं की करू नये?

Health Tips : थायरॉइड झाल्यावर चहाचं सेवन करावं की करू नये? Source link

Health Tips Swollen Legs Feet Ankle Symptoms Marathi News

Swollen Legs Reasons : गुडघ्याच्या खाली तुमच्या पायाला सतत सूज येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published.