Manisha Koirala Birthday Special Know About Actress Life Carrer

Manisha Koirala : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मनीषा कोयरालाचा (Manisha Koirala) आज वाढदिवस आहे. मनीषा ही 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मनीषा ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. मनीषाचा जन्म 16 ऑगस्ट 1970 मध्ये नेपाळमधील काठमांडू येथे झाला. मनीषाचे वडील प्रकाश कोयराला हे कॅबिनेट मंत्री होते. मनीषाच्या आईचं नाव सुषमा कोयराला आहे. 1989 मध्ये रिलीज झालेल्या फेरी भेटौला या चित्रपटामधून मनीषानं करिअरला सुरुवात केली. तिनं सलमान, शाहरुख, आमिर, गोविंदा, संजय दत्त यांसारख्या कलाकारांसोबत काम केलं आहे. मनीषाच्या आयुष्यात बरेच चढ- उतार आले. जाणून घेऊयात मनीषाबद्दल… 

टिकला नाही संसार
1991 मध्ये रिलीज झालेल्या सौदागर या चित्रपटामधून मनीषानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अकेले हम अकेले तुम, अग्निसाक्षी, बॉम्बे, खामोशी, दिल से आणि मन यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये मनीषानं काम केलं. मनीषाचं नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडलं जात होतं पण मनीषानं बिझनेसमॅन सम्राट दहलसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2010 मध्ये मनीषानं सम्राटसोबत लग्नगाठ बांधली. पण त्यांचा संसार टिकला नाही.  2012 मध्ये सम्राट आणि मनीषा यांचा घटस्फोट झाला. 

कॅन्सरशी झुंझ 
2012 मध्ये मनीषाची तब्येत बिघडली. त्यानंतर तिला मुंबईमधील जसलोक या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथं तिला कळालं की तिला गर्भाशयाच्या कॅन्सरची लागण झाली आहे. त्यानंतर मनीषा उपचार घेण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये गेली. मनीषानं कॅन्सरवर मात करुन पुन्हा अभिनय क्षेत्रात कमबॅक केला. कॅन्सरवर मात केल्यानंतर  ‘हील्ड: हाउ कॅन्सर गेव मी ए न्यू लाइफ’ हे पुस्तक मनीषानं लाँच केलं. डियर माया या 2017 मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटातून मनीषानं कमबॅक केला. मनीषा ही ‘हीरामंडी’ या आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी हे करणार आहेत. मनीषा सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांच्या पोस्ट शेअर करत असते. 

वाचा इतर सविस्तर बातम्या: 


Source link

Check Also

PHOTO: डोनल बिश्तने पुन्हा दाखवली तिच्या सौंदर्याची जादू; फोटो पाहून चाहते घायाळ!

PHOTO: डोनल बिश्तने पुन्हा दाखवली तिच्या सौंदर्याची जादू; फोटो पाहून चाहते घायाळ! Source link

Har Har Mahadev Teaser Release Subodh Bhave Movie

Har Har Mahadev:  महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय इतिहासातील अनन्य साधारण व्यक्तिमत्व …

Happy Birthday Sanjay Mishra Know About Actor Sanjay Mishras Personal Life

Sanjay Mishra Birthday : बॉलिवूड अभिनेते संजय मिश्रा (Sanjay Mishra) आज (6 ऑक्टोबर) आपला वाढदिवस …

Leave a Reply

Your email address will not be published.