Manava Naik Will Be Seen In The Role Of Soyrabai In The Movie Shivpratap Garudzep

Shivpratap Garudzep : अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती अशी चौफेर मुशाफिरी करत अभिनेत्री मनवा नाईकने (Manava Naik) आपली स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. निर्मात्याच्या भूमिकेत शिरल्यानंतर अभिनेत्री म्हणून ती अभावानेच दिसली. मात्र, बऱ्याच कालावधीनंतर आता ती पुन्हा एकदा अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. 

‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटात ती महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नीची सोयराबाई मोहिते यांची महत्त्वपूर्ण भूमिका ती यात साकारणार आहे. ‘जगदंब क्रिएशन’ प्रस्तुत  आणि डॉ. अमोल रामसिंग कोल्हे निर्मित ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे. 5 ऑक्टोबरला ‘शिवप्रताप गरुडझेप’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


बऱ्याच कालावधीनंतर तेसुद्धा ऐतिहासिक चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका करण्याचा योग जुळून आला असून या भूमिकेसाठी मी तितकीच उत्सुक होते, असं मनवा सांगते. अत्यंत रूपवान आणि लावण्यवती असणाऱ्या सोयराबाई यांची भूमिका करायला मिळणं माझ्यासाठी ही महत्तवपूर्ण होतं. माझी ही भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. मला स्वत:ला ही काही वेगळं केल्याचं समाधान या भूमिकेने दिलं आहे.

आग्रा येथील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून युक्ती, साहस व दूरदृष्टी यांच्या जोरावर महाराजांनी मिठाईच्या पेटार्‍यातून बसून स्वतःची व राजपुत्र संभाजीची नजरकैदेतून सुटका करून घेतली. आग्रा येथून यशस्वीपणे निसटून दख्खनमध्ये रायगड येथे येण्यात महाराजांनी यश मिळविले. शिवचरित्रातील ही तेजस्वी यशोगाथा शिवप्रताप गरुड़झेप या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे.

संबंधित बातम्या

Shivpratap Garudzep : ‘शिवप्रताप–गरुडझेप’ चित्रपटाची शिवशक्तीमय भेट; ‘जय भवानी जय शिवराय’ गीत प्रेक्षकांच्या भेटीला

Shivpratap Garudjhep : औरंगजेबाच्या भूमिकेत अभिनेते यतीन कार्येकर; ‘शिवप्रताप गरुडझेप’ पाच ऑक्टोबरला होणार रिलीज
Source link

Check Also

Gandhi Jayanti 2022 The Only Hindi Film Mohandas Karamchand Gandhi AKA Mahatma Gandhi Watched Was Ram Rajya

Gandhi Jayanti 2022 : आज 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची जयंती …

Gandhi Jayanti Mahatma Gandhi Birth Anniversary Bollywood Actors Who Played The Gandhi In Films

मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 2 ऑक्टोबर रोजी जयंती. त्यानिमित्ताने देशभर गांधीजींचं स्मरण केलं जातंय. …

PHOTO : बेन किंग्जले ते नसरुद्दीन शाह… या अभिनेत्यांनी साकारले 'गांधी'

PHOTO : बेन किंग्जले ते नसरुद्दीन शाह… या अभिनेत्यांनी साकारले 'गांधी' Source link

Leave a Reply

Your email address will not be published.