Man Loses Rupies 5 Crore By Ai Face Swapping And The Ai Scammer Prented Like His Close Friend Tech News Marathi

AI Face-Swapping Technology : आजच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) नं आपल्या कारनाम्यांनी जगाला चकित केलं आहे. जगभरात अनेकजण आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सर्रास वापर करत आहेत. मात्र, आता मदतीसाठी वापरल्या जाणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर गैरकामांसाठी केला जात असल्याचं समोर आलं आहे. अलिकडेच चीनमधील एका व्यक्तीची एआयमुळे 5 कोटींची फसवणूक झाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना चीनमध्ये घडली असून त्यामुळे AI च्या वापरावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

चीनमधील बाओटो शहरात एका व्यक्तीची 5 कोटींची फसवणूक झाली आहे. डीपफेक तंत्राचा वापर करून मित्र असल्याची बतावणी करत 5 कोटींची मागणी केली. आपलाच मित्र आहे असं समजून त्या व्यक्तीनंही दुसऱ्याच कोणालातरी पैसे दिले. 

डीपफेक नेमके आहे काय?

अलिकडेच डीपफेक टेक्नॉलॉजीचा वापर करून एका व्यक्तीची 5 कोटी रूपयांची फसवणूक केली आहे. ही फसवणूकीची घटना चीनमधील आहे. यावरून टेक्नॉलॉजी किती प्रगत आहे हे लक्षात येतं. टेक्नॉलॉजीतील या वेगवान बदलांची अनेक लोकांना कल्पनाही नाही. लोकांना जर विचारलं की, डीपफेक टेक्नॉलॉजी म्हणजे काय? तर माहिती नाही? असंच उत्तर मिळेल. या टेक्नॉलॉजीचा वापर करून ऑनलाईन फेक फोटोज आणि व्हिडीओ बनवले जाऊ शकतात. हे फोटो आणि व्हिडीओ बघितल्यानंतर अगदी हुबेहुब आपल्याच ओळखीची व्यक्ती आहे, असंच वाटतं. त्यामुळे एआय चॅटबॉटचा चुकीच्या गोष्टींचा प्रचार-प्रसार केला जाऊ शकतो. हे खूप धोकादायक आहे. 

AI च्या मदतीनं 5 कोटींना गंडा 

डीपफेक टेक्नॉलॉजीचा वापर करुन लोक बनावट चित्र आणि व्हिडीओ वास्तव म्हणून दाखवतात. रॉयटर्सच्या अहवालानुसार, उत्तर चीनमधील एका व्यक्तीनं प्रगत डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर केला आणि तब्बल 5 कोटींना गंडा घातला. एका व्यक्तीला मित्र असल्याचं भासवत त्याच्याकडून तब्बल 5 कोटींची रक्कम स्वतःच्या खात्यात वळती करुन घेतली. आरोपीनं AI च्या फेस-स्वॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर केला आणि पीडित व्यक्तीच्या मित्राचं रुप धारण केलं. 

आपल्या मित्राला पैशांची नितांत गरज आहे, असं वाटल्यानं त्यानंही पैसे दिले, असं फसवणूक झालेल्या व्यक्तीनं पोलिसांना सांगितलं. त्यानंतरही आपल्यासोबत फसवणूक झाल्याची जराशीही माहिती या व्यक्तीला नव्हती. त्यानंतर मैत्रिणीनं सत्य समोर आल्यावर आपली फसवणूक झाल्याचं सदर व्यक्तीच्या लक्षात आलं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तरी, पोलिसांत धाव घेत घडल्या प्रकाराबाबत सदर व्यक्तीनं तक्रार दाखल केली. पोलिसांनीही तात्काळ तपासाची सूत्र हलवली. पोलिसांनी एकूण रकमेपैकी काही रक्कम परत मिळवली आहे. तसेच, उर्वरित रक्कम परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

या घटनेमुळे आर्थिक गुन्ह्यांसाठी एआयसारख्या प्रगत टेक्नॉलॉजीचा वापर केल्यामुळे चीनमधील लोकांची चिंता वाढली आहे. यावरून भारतातील लोकांनीही ऑनलाईन फ्रॉडपासून सावध राहायची आवश्यकता आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Artificial Intelligence : ChatGPT चे CEO Sam Altman यांच्याकडून कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्याची चिंता व्यक्त, सरकारने हस्तक्षेप करण्याचं आवाहन 


Source link

Check Also

New Malware DogeRAT Remote Access Trojan Spreading Through Fake Android Apps Know How To Be Safe Detail Marathi News

DogeRAT Malware:  DogerAT (रिमोट ऍक्सेस ट्रोजन) या नव्या व्हायरसचा शोध संशोधकांनी लावला असून बनावट अॅप्सच्या …

Samsung Galaxy F54 5G India Launch Date Confirmed Officially Expect Price Features Samsung Galaxy F54 5G Pre Booking

Samsung Galaxy F54 5G मध्ये कंपनी Galaxy M54 5G स्मार्टफोन प्रमाणेच स्पेसिफिकेशन आणि फिचर्स देऊ …

Iphone 15 And 15 Pro Will Soon Launch In India Iphone 15 Price Launch Date Charging Feature Detail Marathi News

iPhone 15 series: आताच्या तरुण पिढीमध्ये आयफोनचे (Iphone) युजर्स अधिक आहेत जे आयफोनच्या नव्या सीरिजची …

Leave a Reply

Your email address will not be published.