Karkhanisanchi Waari Co Produced By ABP Studios Wins Best Film At Pravah Picture Awards

Karkhanisanchi Waari : ‘कारखानीसांची वारी’ (Karkhanisanchi Waari) हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अनेक पुरस्कार सोहळ्यात या सिनेमाने बाजी मारली आहे. आता प्रवाह पिक्चर पुरस्कार’ सोहळ्यात एबीपी स्टुडिओची सह-निर्मिती असलेला ‘कारखानिसांची वारी’ हा सिनेमा सर्वोत्कृष्ट ठरला आहे. 

मराठी कलाविश्वातील दिग्गजांच्या उपस्थितीत नुकताच ‘प्रवाह पिक्चर पुरस्कार’ सोहळा अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला आहे. या पुरस्कार सोहळ्यात ‘कारखानिसांची वारी’ या सिनेमाने सर्वोत्कृष्ट चित्रपटासह, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट संवाद लेखक, सर्वोत्कृष्ट पात्र योजना अशा अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे. 

‘कारखानीसांची वारी’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा मंगेश जोशी यांनी सांभाळली आहे. या सिनेमात मोहन आगाशे, वंदना गुप्ते, अमेय वाघ, प्रदीप वेलणकर, गीतांजली कुलकर्णी आणि शुभांगी गोखले अशी तगडी स्टारकास्ट आहे. एकत्रित कुटुंबावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. एकत्रित कुटुंबाचं भावविश्व उलगडण्याचं काम या सिनेमाने केलं आहे. 

‘आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ‘कारखानीसांची वारी’चा डंका


‘कारखानीसांची वारी’ या सिनेमाने अनेक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल गाजवले आहेत. इफ्फी, टोकियो फिल्म फेस्टिव्हल सारख्या अनेक फिल्म फेस्टिव्हलचा यात समावेश आहे. ‘प्रवाह पिक्चर पुरस्कार’ सोहळ्याआधी या सिनेमाने ‘फिल्म फेअर पुरस्कार सोहळ्यात’ सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार पटकावला आहे. तसेच ‘मटा सन्मान 2022’ मध्ये या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचे नामांकन मिळाले होते. फिल्म फेस्टिव्हलमध्येदेखील ‘कारखानीसांची वारी’ या सिनेमाचा सहभाग होता. 

संबंधित बातम्या

Karkhanisanchi Waari : एबीपी स्टुडिओची सह-निर्मिती असलेल्या ‘कारखानीसांची वारी’चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

Filmfare Awads Marathi : एबीपी स्टुडिओची सह-निर्मिती असलेल्या ‘कारखानीसांची वारी’ने पटकावला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार




Source link

Check Also

Prabhas Saif Ali Khan And Kriti Sanon Starrer Adipurush First Poster Out

Adipurush Poster Out: साऊथचा सुपरस्टार प्रभासच्या (Prabhas) बहुप्रतीक्षित ‘आदिपुरुष’ (Adipurush) या चित्रपटाचे पहिले अधिकृत पोस्टर …

Turkish Melek Mosso Cut Her Hair For Iran Hijab Row Support Video Viral

Iran Hijab Protest: इराणमधील (Iran) हिजाब विरोधी चळवळ दिवसेंदिवस आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. आता …

Netizens Trolling For  marathi Actress Prajakta Mali On Post For India From London  

मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती …

Leave a Reply

Your email address will not be published.