Kareena Kapoor Faced Misbehavior Of Fans At Airport

Kareena Kapoor: बॉलिवूडमधील प्रसिद्ध करीना कपूर (Kareena Kapoor Khan) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. तिच्या चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये करीना मुंबई एअरपोर्टवर चाहत्यांसोबत सेल्फी काढताना दिसत आहे. पण या दरम्यान करीनाचे काही चाहते धक्का-बुक्की करताना दिसत आहेत. 

करीनाच्या एका आगामी चित्रपटाचे शूटिंग लंडन येथे होत आहे. लंडनला जाण्यासाठी करीना सोमवारी (3 सप्टेंबर) मुंबई एअरपोर्टवर आली. यावेळी करीनाला पाहण्यासाठी एअरपोर्टवरील लोकांनी गर्दी केली. करीनासोबत सेल्फी काढण्यासाठी काही लोक धक्का-बुक्की करत होते. त्यावेळी काहींनी करीनाची बॅक देखील खेचली. हे सर्व घडत असताना करीना मात्र शांत उभी राहून सर्व चाहत्यांसोबत सेल्फी काढत होती. करीनाच्या या वागण्याचे आनेकांनी कौतुक केले. मुंबई एअरपोर्टवरील करीनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

पाहा व्हिडीओ: 


नेटकऱ्यांच्या कमेंट्स 

व्हायरल व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘हे बरोबर नाही, चाहत्यांनी तिला चांगली वागणूक दिली नाही.’ तर दुसऱ्या युझरनं लिहिलं, ‘अशा परिस्थितीमध्ये करीना शांत राहिली. ती ओरडली असती तरी देखील लोकांनी तिला ट्रोल केलं असतं.’

काही दिवसांपूर्वी करीनाचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाला प्रेक्षकांची फारशी पसंती मिळाली नाही. आता करीनाच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Karan Johar, Kareena Kapoor : करण जोहरचे बेधडक बोल, म्हणाला ‘करीना कपूरला डेट करायचं होतं’!
Source link

Check Also

actor vikram gokhale has passed away vikram gokhale Vikram Gokhale Dealth Live updates Vikram Gokhale Dealth Vikram Gokhale funeral live updates

Vikram Gokhale : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम …

Vikram Gokhale Vikram Gokhale Inherited Acting In His Family Acting Lessons Given By Grandparents

Vikram Gokhale : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन …

In Pics: फुलाफुलांचा भन्नाट ड्रेस! नुसरतच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस

In Pics: फुलाफुलांचा भन्नाट ड्रेस! नुसरतच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस Source link

Leave a Reply

Your email address will not be published.