Kangana Ranaut In The End The Monster Won Kangana Was Hurt By The Shraddha Walker Case

Kangana Ranaut Reacts On Shraddha Walkar Case : बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौत (Kangana Ranaut) नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असते. आता तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणावर भाष्य केलं आहे. कंगनाने म्हटलं आहे,”ती एक मुलगी होती आणि तिच्या आत एक स्त्रीचं मन होतं”.

कंगनाने 2020 साली पोलिसांना लिहिलेलं पत्र शेअर करत लिहिलं आहे,”श्रद्धाने हे पत्र 2020 मध्ये लिहिलं होतं. आफताबपासून वाचण्यासाठी तिला पोलिसांची मदत हवी होती. त्याने अनेकदा तिला घाबरवलं आहे. तसेच तुकडे करण्याची धमकी दिली आहे. त्याने तिला ब्लॅकमेल करत जगापासून वेगळं केलं आहे”. 

कंगनाने पुढे लिहिलं आहे,”आफताबने श्रद्धाला लग्नाचं वचन दिलं होतं. ती काही कमजोर नव्हती. ती एक मुलगी होती. या जगात जगण्यासाठी ती जन्माला आली होती. पण तिच्या आत एक स्त्रीचं मन होतं. पृथ्वीप्रमाणेच स्त्रीलादेखील गर्भ आहे. त्यामुळे ती कधी कोणासोबत भेदभाव करत नाही”

News Reels

ती परीकथेत रमणारी मुलगी होती. तिला त्या कथांवर विश्वास होता. जगाला तिच्या प्रेमाची गरज आहे असं तिला वाटत होतं. परीकथेतल्या राक्षसासोबत लढण्याचा ती प्रयत्न करत होती. त्या राक्षसाला मारण्याचे तिने खूप प्रयत्न केले. पण शेवटी राक्षसच जिंकला आणि तिचे तेच झाले…”

श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणामुळे बेधडक कंगना खूप दुखावली आहे. या प्रकरणाचा तिला खूप राग आला आहे. पोस्ट लिहित तिने श्रद्धाची मानसिक स्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. कंगनाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


कंगनाचे आगामी सिनेमे –

कंगना रनौतचा ‘इमर्जन्सी’  सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती इंदिरा गांधीच्या भूमिकेत दिसणार असून या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरादेखील ती सांभाळणार आहे. लवकरच तिचा ‘तेजस’ हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. तसेच ‘सीता’ आणि ‘इमली’ या सिनेमातदेखील ती दिसणार आहे. तसेच ‘नटी बिनोदिनी’ या सिनेमाच्या शूटिंगला ती लवकरच सुरुवात करणार आहे. 

संबंधित बातम्या

Nilam Gorhe : ठाकरे गटातील नेत्याने केली केतकी चितळेची तुलना थेट कंगनाशी, म्हणाल्या…
Source link

Check Also

actor vikram gokhale has passed away vikram gokhale Vikram Gokhale Dealth Live updates Vikram Gokhale Dealth Vikram Gokhale funeral live updates

Vikram Gokhale : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम …

Vikram Gokhale Vikram Gokhale Inherited Acting In His Family Acting Lessons Given By Grandparents

Vikram Gokhale : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन …

In Pics: फुलाफुलांचा भन्नाट ड्रेस! नुसरतच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस

In Pics: फुलाफुलांचा भन्नाट ड्रेस! नुसरतच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस Source link

Leave a Reply

Your email address will not be published.