Kamaal R Khan Aka Krk Informed His Twitter Followers That He Is Back Home After Getting Bail

Kamaal Rashid Khan : कमाल आर खान (Kamaal Rashid Khan) उर्फ ​​केआरकेला काही दिवसांपूर्वी 2020 मध्ये केलेल्या वादग्रस्त ट्वीट प्रकरणी आणि चित्रपटात काम देतो असं सांगून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. कमाल आर खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.  ​​केआरकेला जामीन मिळाला आहे. जामीन मिळाल्यानंतर केआरकेनं पहिलं ट्वीट शेअर केलं होतं. त्यामध्ये त्यानं लिहिलं होतं की, ‘मी बदला घ्यायला परत आलोय’ या ट्वीटमध्ये रेड अँग्री स्माईली इमोजीचा वापर देखील केआरकेनं केला. केआरकेच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधलं. पण आता केआरकेनं दुसरं ट्वीट शेअर करुन सांगितलं आहे की, ‘मला कोणाचाही बदला घ्यायचा नाही’

केआरकेचं ट्वीट
केआरकेनं ट्वीटमध्ये लिहिलं, ‘मीडिया नव्या स्टोरीज बनवत आहे. मी परत आलो आहे आणि माझ्या घरी मी सुरक्षित आहे. मला कोणाचाही बदला घ्यायचा नाहीये.  माझ्यासोबत जे काही वाईट घडले ते मी विसरलो आहे. हे माझ्या नशिबात लिहिले होते, असं मी समजतो.’ केआरके हा सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करतो. त्याच्या या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. 

सितम,मुन्ना पांडे बेरोजगार,देशद्रोही, एक व्हिलन यांसारख्या चित्रपटांमध्ये कमाल आर खाननं सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली. यामधील देशद्रोही या चित्रपटाची निर्मिती देखील कमालनं केली होती. 2009 मध्ये रिलीज झालेल्या बिग बॉस या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाच्या तिसऱ्या सिझनमध्ये कमाल आर खाननं सहभाग घेतला होता. हिंदी आणि भोजपुरी सिनेमांत त्यानं काम केलं आहे. बॉलिवूडमधील कलाकारांबद्दल अक्षेपार्ह वक्तव्य कमाल करत असतो. तसेच वेगवेगळ्या बॉलिवूड चित्रपटांचे रिव्ह्यू देखील तो सोशल मीडियावर शेअर करतो. आता केआरके ब्रह्मास्त्र या चित्रपटाचा रिव्हू करणार का? याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Kamaal Rashid Khan : ‘मी बदला घ्यायला परत आलोय’; जामीन मिळाल्यानंतर केआरकेचं पहिलं ट्वीट
Source link

Check Also

Gandhi Jayanti Mahatma Gandhi Birth Anniversary Bollywood Actors Who Played The Gandhi In Films

मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 2 ऑक्टोबर रोजी जयंती. त्यानिमित्ताने देशभर गांधीजींचं स्मरण केलं जातंय. …

PHOTO : बेन किंग्जले ते नसरुद्दीन शाह… या अभिनेत्यांनी साकारले 'गांधी'

PHOTO : बेन किंग्जले ते नसरुद्दीन शाह… या अभिनेत्यांनी साकारले 'गांधी' Source link

Majha Katta Youths Need To Take Initiative To Experiment With Dramas Like Mahanirvan And Begham Barve Said Satish Alekar On Majha Katta

Satish Alekar On Majha Katta : ‘महानिर्वाण’ या लोकप्रिय नाटकाचे वेगवेगळ्या भाषेत प्रयोग होतात. पण …

Leave a Reply

Your email address will not be published.