Justin Bieber Cancels Justice World Tour Not To Perform In India

Justin Bieber : हॉलिवूडचा लोकप्रिय गायक जस्टिन बीरचे (Justin Bieber) चाहते जगभर आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी जस्टिन बीबर आजाराशी झुंज देत असल्याने चर्चेत आला होता. पण आता जस्टिन बीबर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जस्टिन बीबरने वर्ल्ड टूर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतात होणारी कॉन्सर्ट पुढे ढकलली

जस्टिन बीबरची भारतातदेखील कॉन्सर्ट होणार होती. त्यामुळे भारतातील त्याचे चाहते या कॉन्सर्टची आतुरतेने वाट पाहत होते. पण आता भारतात होणारी कॉन्सर्ट पुढे ढकलण्यात आल्याने त्याचे चाहते नाराज झाले आहेत. याआधी 2017 साली जल्टिन भारतात आला होता. जस्टिनने ‘जस्टिस’ या अल्बमच्या प्रमोशनसाठी जगातील अनेक देशांचा दौरा करण्याची घोषणा केली होती. पण आता प्रकृती खालावल्याने हा दौरा रद्द करण्याचा निर्णय जस्टिनने घेतला आहे. 

प्रकृती बिघडल्याने वर्ल्ड टूर रद्द 

प्रकृती अचानक बिघडल्याने जस्टिन बीबरने ही वर्ल्ड टूर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जस्टिन बीबरने सोशल मीडियावर एका खास पोस्ट शेअर करत दौरा रद्द केल्याची घोषणा केली आहे. जस्टिन बीबर ‘हंट सिंड्रोम’ या आजाराचा सामना करत आहे. 

जस्टिन बीबरची पोस्ट काय?

आजारपणामुणे वर्ल्ड टूर रद्द झाल्याने जस्टिनने लांबलचक पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,”मला ब्राझीलच्या चाहत्यांना माझं गाणं ऐकवायचं होतं. पण स्टेजवर गेल्यावर अचानक मला खूप थकल्यासारखं वाटलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, यावेळी मी माझ्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं. त्यामुळेच मी सध्या टूरमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेत आहे. मी लवकरच ठीक होईन. पण सध्या मला विश्रांतीची गरज आहे, यामुळे माझ्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होईल”


संबंधित बातम्या

Ramsay Hunt syndrome, Justin Bieber : जस्टिन बीबरची भयंकर आजाराशी झुंज! भारतातील दौरा रद्द होणार, जाणून घ्या ‘या’ आजाराबद्दल…

Justin Bieber Tour : गंभीर आजाराचा सामना करणाऱ्या जस्टिन बीबरचं स्टेजवर कमबॅक; चाहत्यांना दिला खास मेसेज
Source link

Check Also

Netizens Trolling For  marathi Actress Prajakta Mali On Post For India From London  

मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती …

PHOTO: कॅमेऱ्यात कैद झाला TMC खासदार नुसरत जहाँचा ब्रालेट लूक; पाहा फोटो!

PHOTO: कॅमेऱ्यात कैद झाला TMC खासदार नुसरत जहाँचा ब्रालेट लूक; पाहा फोटो! Source link

Ranveer Singh Talks About His Relationship With Deepika Padukone Amid Separation Rumours

Ranveer Singh, Deepika Padukone : बॉलिवूडची ‘मस्तानी’ अर्थात अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि ‘बाजीराव’ …

Leave a Reply

Your email address will not be published.