Jacqueline Fernandez Summoned Again By Delhi Police Directed To Appear On 19th September

Jacqueline Fernandez Money Laundering Case : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) गेल्या अनेक दिवसांपासून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. आता ईडीकडून जॅकलीनला पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आलं आहे. 19 सप्टेंबरला (उद्या) जॅकलीनला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. 

14 सप्टेंबरलादेखील जॅकलीनला ईडीने न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. त्यावेळी जॅकलीनची तबब्ल आठ तास चौकशी सुरू होती. ईडीने जॅकलीनचा जबाब नोंदवून घेतला होता. त्यावेळीच जॅकलीनला पुन्हा चौकशीसाठी बोलवलं जाऊ शकतं, अशी शक्यता वर्तवली होती. 14 सप्टेंबरला जॅकलीनला सुकेश चंद्रशेखरसोबत तिचे असणारे नातेसंबंध आणि त्याच्याकडून मिळालेल्या भेटवस्तू यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले होते. 

जॅकलीन फर्नांडिस मनी लॉन्ड्रिंग प्रकरण नक्की काय आहे? 

अंमलबजावणी संचालनालयाच्या दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, जॅकलिनला सुकेश चंद्रशेखरने (Sukesh Chandrashekhar) 10 कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्या आणि हा पैसा सुकेशने केलेल्या 200 कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणातला होता. जॅकलिनला याची पूर्वकल्पना असताना तिने ही भेटवस्तू स्वीकारल्यामुळे जॅकलिनला या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे.

सुकेशनं जॅकलीनला दिली महागडे गिफ्ट्स

सुकेशनं पाच जनावरं जॅकलिनला भेट म्हणून दिल्याचं समोर आलं आहे. त्यातल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख आणि प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेली एकूण 36 लाखांच्या 4 पर्शियन मांजरांचाही समावेश आहे. जॅकलिनला सुकेशनं महागडी ज्वेलरी देखील भेट म्हणून दिली आहे. या कलेक्शनमध्ये 15 लाखांच्या इअरिंग्सचा (कानातले) समावेश आहे. तसेच दोन डायमंड इअरिंग्स, कार्टियर बांगड्या आणि टिफनी ब्रेसलेट देखील जॅकलिनला सुकेशनं दिले.

जॅकलीनचे आगामी प्रोजेक्ट

जॅकलीनचे अनेक प्रोजेक्ट सध्या पाईपलाईमध्ये आहेत. ‘रामसेतू’ या सिनेमाच्या माध्यमातून ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात जॅकलीनसोबत नुसरत भरुचा आणि अक्षय कुमार स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. 

संबंधित बातम्या

Nora Fatehi : अभिनेत्री नोरा फतेहीची आज पुन्हा ईडी चौकशी, अडचणी वाढणार?

Money Laundering Case : जॅकलिन फर्नांडिस हाजीर हो! 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्रीची चौकशी होणार
Source link

Check Also

Turkish Melek Mosso Cut Her Hair For Iran Hijab Row Support Video Viral

Iran Hijab Protest: इराणमधील (Iran) हिजाब विरोधी चळवळ दिवसेंदिवस आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. आता …

Netizens Trolling For  marathi Actress Prajakta Mali On Post For India From London  

मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती …

PHOTO: कॅमेऱ्यात कैद झाला TMC खासदार नुसरत जहाँचा ब्रालेट लूक; पाहा फोटो!

PHOTO: कॅमेऱ्यात कैद झाला TMC खासदार नुसरत जहाँचा ब्रालेट लूक; पाहा फोटो! Source link

Leave a Reply

Your email address will not be published.