Jacqueline Fernandez Rise In Trouble Eight Hours Of Interrogation By ED

Jacqueline Fernandez : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) सध्या सुकेश चंद्रशेखर मनी लॉंड्रिंग प्रकरणी चर्चेत आहे. जॅकलीनला ईडीने (आज) 14 सप्टेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जॅकलीन आज न्यायालयात चौकशीसाठी हजर राहिली. एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल आठ तास जॅकलीनची चौकशी सुरू होती.

सुकेश चंद्रशेखर प्रकरणी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले होते. तब्बल आठ तास जॅकलीनची चौकशी सुरू होती. ईडीने जॅकलीनचा जबाब नोंदवून घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जॅकलीनला गरज पडल्यास पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवलं जाऊ शकतं”. सुकेश चंद्रशेखरसोबत जॅकलीनचे नातेसंबंध आणि त्याच्याकडून मिळालेल्या भेटवस्तू याबाबतचे विविध प्रश्न आज जॅकलीनला विचारण्यात आले आहेत.

जॅकलीन फर्नांडिस मनी लॉन्ड्रिंग प्रकरण नक्की काय आहे? 

अंमलबजावणी संचालनालयाच्या दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, जॅकलिनला सुकेश चंद्रशेखरने 10 कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्या आणि हा पैसा सुकेशने केलेल्या 200 कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणातला होता. जॅकलिनला याची पूर्वकल्पना असताना तिने ही भेटवस्तू स्वीकारल्यामुळे जॅकलिनला या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे.

सुकेशनं जॅकलीनला दिली महागडे गिफ्ट्स

सुकेशनं पाच जनावरं जॅकलिनला भेट म्हणून दिल्याचं समोर आलं आहे. त्यातल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख आणि प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेली एकूण 36 लाखांच्या 4 पर्शियन मांजरांचाही समावेश आहे. जॅकलिनला सुकेशनं महागडी ज्वेलरी देखील भेट म्हणून दिली आहे. या कलेक्शनमध्ये 15 लाखांच्या इअरिंग्सचा (कानातले) समावेश आहे. तसेच दोन डायमंड इअरिंग्स, कार्टियर बांगड्या आणि टिफनी ब्रेसलेट देखील जॅकलिनला सुकेशनं दिले.

जॅकलीनचे अनेक प्रोजोक्ट सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. तिला ‘रामसेतू’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात जॅकलीनसह नुसरत भरुचा आणि अक्षय कुमारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.  

संबंधित बातम्या

Money Laundering Case : जॅकलिन फर्नांडिस हाजीर हो! 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्रीची चौकशी होणार

Jacqueline Fernandez : ‘नोरा फतेही साक्षीदार मग मी आरोपी का?’ जॅकलिन फर्नांडिसचा ईडीला सवाल
Source link

Check Also

Gandhi Jayanti Mahatma Gandhi Birth Anniversary Bollywood Actors Who Played The Gandhi In Films

मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 2 ऑक्टोबर रोजी जयंती. त्यानिमित्ताने देशभर गांधीजींचं स्मरण केलं जातंय. …

PHOTO : बेन किंग्जले ते नसरुद्दीन शाह… या अभिनेत्यांनी साकारले 'गांधी'

PHOTO : बेन किंग्जले ते नसरुद्दीन शाह… या अभिनेत्यांनी साकारले 'गांधी' Source link

Majha Katta Youths Need To Take Initiative To Experiment With Dramas Like Mahanirvan And Begham Barve Said Satish Alekar On Majha Katta

Satish Alekar On Majha Katta : ‘महानिर्वाण’ या लोकप्रिय नाटकाचे वेगवेगळ्या भाषेत प्रयोग होतात. पण …

Leave a Reply

Your email address will not be published.