Ira Khans Boyfriend Nupur Shikhare Nude Photoshoot Goes Viral On Social Media

Nupur Shikhare : बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्टनिस्ट’ अभिनेता आमिर खान (Aamir Khan) याची लेक आयरा खान (Ira Khan) आणि होणारा जावई नुपूर शिखरे (Nupur Shikhare) सध्या प्रचंड चर्चेत आहेत. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत नुपूरने आपल्याला लग्नाची मागणी घातल्याचे आयरा खानने म्हटले आहे. या सोबतच तिने या प्रपोजलचा रोमॅटिक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र, आता आमिर खान याचा होणारा जावई नुपूर शिखरे एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. एंगेजमेंटच्या व्हिडीओनंतर आता सोशल मीडियावर नुपूर शिखरेचं न्यूड फोटोशूट व्हायरल होत आहे.

आयराने प्रपोजल व्हिडीओ शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर देखील नुपूर शिखरेबद्दलच्या गोष्टी सर्च केल्या जात आहेत. यातच आता नेटकऱ्यांच्या हाती नुपूरचे न्यूड फोटोशूट लागले आहे. फिटनेस ट्रेनर असणाऱ्या नुपूर शिखरेने तीन वर्षांपूर्वी न्यूड फोटोशूट केले होते. त्यावेळी त्याच्या या फोटोशूटची फारशी चर्चा देखील झाली नसावी. पण, आता आमिरची लेक आयरा हिच्यासोबत नाव जोडले गेल्यानंतर हे फोटोशूट सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आले आहे.

पाहा पोस्ट :

नुपूर शिखरेने (Nupur Shikhare) 2019मध्ये हे फोटोशूट केले होते. याचे फोटो आजही त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आहेत. आयराला प्रपोज केल्यानंतर आता पुन्हा एकदा हे फोटो नेटकऱ्यांनी शोधून काढले आहेत. नुपूर शिखरने हे फोटो शेअर करताना फोटोंसोबत एक लांबलचक कॅप्शन लिहिले आहे. यात त्याने लिहिलेय की, ‘धावणे ही एक शिस्त आहे, जी मी स्वतःला लावली आहे. हे सवय तुम्हाला खूप काही शिकवते. जर तुम्ही रोज धावत असाल, तर तुम्हाला खूप काही शिकायला मिळू शकते.’

आयरा खानमुळे चर्चेत आलाय नुपूर शिखरे

नुपूर शिखरे हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. मात्र, सध्या तो आमिरच्या लेकीला अर्थात आयरा खान (Ira khan) हिला डेट करत असल्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. आयरा आणि नुपूर दोघेही एकमेकांना 2020पासून डेट करत आहेत. इतकेच नव्हे तर, सोशल मीडियावर फोटो आणि रोमँटिक व्हिडीओ शेअर करत ते एकमेकांवरील प्रेमाची कबुली देताना दिसतात. आमिरची लेक अभिनेत्री नसली तरी तिची प्रसिद्धी एखाद्या बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. सोशल मीडियावरदेखील आयरा आणि नुपूरची जोडी हिट ठरली आहे. मात्र, आता या न्यूड फोटोशूटमुळे पुढे आणखी काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. असाच प्रकारच्या एका फोटोशूटमुळे अभिनेता रणवीर सिंह याला कायद्याच्या कचाट्यात अडकावे लागले होते.   

हेही वाचा :

Ira Khan : जमलं रे जमलं! आमिर खानची लेक आयरा झाली ‘एंगेज’; बॉयफ्रेंड नुपूर शिखरेने हटके अंदाजात घातली लग्नाची मागणी

Ira Khan : नैराश्यानंतर आमिर खानची लेक ‘या’ गंभीर आजाराशी देतेय झुंज


Source link

Check Also

Gandhi Jayanti 2022 The Only Hindi Film Mohandas Karamchand Gandhi AKA Mahatma Gandhi Watched Was Ram Rajya

Gandhi Jayanti 2022 : आज 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची जयंती …

Gandhi Jayanti Mahatma Gandhi Birth Anniversary Bollywood Actors Who Played The Gandhi In Films

मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 2 ऑक्टोबर रोजी जयंती. त्यानिमित्ताने देशभर गांधीजींचं स्मरण केलं जातंय. …

PHOTO : बेन किंग्जले ते नसरुद्दीन शाह… या अभिनेत्यांनी साकारले 'गांधी'

PHOTO : बेन किंग्जले ते नसरुद्दीन शाह… या अभिनेत्यांनी साकारले 'गांधी' Source link

Leave a Reply

Your email address will not be published.