India Will Pray For Afghanistan Win Against Pakistan In Asia Cup 2022 Super Four Team India Chance To Enter In Final

Asia Cup 2022 : आशिया चषकाच्या (Asia Cup 2022) श्रीलंकेने भारताचा पराभव केल्यानंतर या स्पर्धेतील भारताचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. आशिया चषकातील सुपर 4 लढतीमध्ये भारताचा हा सलग दुसरा पराभव आहे. मात्र, अशा स्थितीत देखी भारताला अंतिम सामन्यात पोहोचण्याची संधी मिळू शकते. त्यासाठी अफगानिस्तानच्या आजचा पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकणे गरजेचं आहे. आज पाकिस्तान आणि अफगानिस्तान यांच्यात लढत होत आहे. यामध्ये जर अफगानिस्तानच्या संघानं विजय मिळवला तर भारताला पुढे जाण्याची संधी मिळू शकते.

काल (बुधुवार) भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यात श्रीलंकेनं भारताचा पराभव केला. हा निकाल अनेकांना अनपेक्षित होता. स्पर्धेच्या सुरुवातीला अडखळणाऱ्या श्रीलंकने दमदार पुनरागमन केलं आहे. बंगलादेशविरुद्ध अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवत सुपर फोरमध्ये आलेला श्रीलंकेचा संघ अंतिम सामन्यात पोहोचलेला पहिला संघ ठरला आहे. एकीकडे श्रीलंकेने अंतिम फेरीत मजल मारली असली तरी दुसरीकडे सलग दुसऱ्या पराभवामुळे भारताची वाट अवघड झाली आहे. पुढील प्रवासासाठी भारताला मुख्यपणे पाकिस्तानवर अवलंबून रहावं लागणार आहे. आज होणाऱ्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानला पराभूत करणे गरजेचे आहे. तसेच भारताने अफगाणिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत करणे गरजेचे आहे. त्याचबरोब श्रीलंकेने पाकिस्तानला पराभूत करणे देखील गरजेचं आहे. सुपर फोरमधील सर्व सामने संपल्यानंतर भारताचं नेट रनरेट हा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानपेक्षा अधिक असायला हवा. 

अफगाणिस्तानचा संघ जर श्रीलंका, पाकिस्तानविरुद्ध पराभूत झाला तर पाकिस्तान आणि श्रीलंका असा अंतिम सामना होईल. अफगाणिस्तानने पाकिस्तानला पराभूत केलं तर भारताला अफगाणिस्तानविरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकून स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी श्रीलंकेवर अवलंबून रहावं लागणार आहे. श्रीलंकेने आपली विजयी घौडदौड सुरु ठेवत पाकिस्तानला पराभूत केलं तर अंतिम सामन्यात श्रीलंकेचा संघ पुन्हा एकदा भारताविरुद्ध मैदानात उतरेल. 

भारताला अंतिम फेरी गाठायची असेल, तर सर्वात आधी आजच्या सामन्यात अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर विजय आवश्यक असेल. यानंतर भारतीय संघाला पुढील सामन्यात अफगाणिस्तानला पराभूत करावं लागेल. शेवटी भारताला पाकिस्तान आणि श्रीलंकेतील सामन्यात  श्रीलंकेच्या विजयाची प्रार्थना करावी लागणार आहे. सुपर-4 मध्ये, श्रीलंका त्यांचे दोन्ही सामने जिंकून सुपर-4 टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. अंतिम फेरी गाठण्याच्या अगदी जवळ आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचा संघ भारताला हरवून दुसऱ्या स्थानावर आहे. तर सुपर-4 मध्ये भारताने आपले दोन्ही सामने गमावले आहेत. आणि अफगाण संघ श्रीलंकेकडूनही सामना हरला आहे. अशा परिस्थितीत, आज अफगाणिस्तानच्या संघाने पाकिस्तानचा पराभव करणे भारतासाठी गरजेचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या:


Source link

Check Also

If Sunil Gavaskar is backing me, then he must have seen something in me: Ravi Bishnoi

Ravi Bishnoi, who has not been picked for the T20 World Cup, said he is …

India Skipper Rohit Sharma Breaks Ms Dhoni Records Against South Africa 1st T20I

India vs South Africa 1st T20I: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं 8 विकेट्सनं (IND …

India Legends vs Australia Legends, Semi-final 1 Highlights: Naman Ojha, Irfan Pathan guide INDL to 5-wicket win

India Legends Squad Playing: Naman Ojha (wk), Sachin Tendulkar (c), Suresh Raina, Yuvraj Singh, Yusuf …

Leave a Reply

Your email address will not be published.