IND Vs SA 1st ODI 2022 LIVE Updates Live Toss Delayed Due To Wet Field Both Sides Play 45 Overs

IND vs SA, Toss Delayed : शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्त्वाखाली आज भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेला सुरुवात करणार आहे. पण भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्याला पावसाच्या व्यत्ययामुळे सुरु होण्यास उशिर होत आहे. दरम्यान पावसाने आता काहीशी विश्रांती घेतल्यामुळे काही वेळातच नाणेफेक होणार आहे, मात्र सामन्याची 1.30 वाजताची वेळ पुढे ढकलल्याने दोन्ही संघाला 45 ओव्हर्स खेळायला मिळणार आहेत.

सामना उशिराने सुरु होणार या माहितीनंतर 2.45 मिनिटांनी नाणेफेक होणार असून 3 वाजता सामना सुरु होईल अशीही माहिती समोर आली होती. पण त्यानंतक 2.50 च्या सुमारास बीसीसीआयनं पुन्हा एकदा मैदानाजवळील फोटो शेअर करत नाणेफेकीला आणखी उशिर होणार असल्याचं सांगितलं.

कसा निवडला आहे संघ?

एकदिवसीय मालिकेसाठी जाहीर केलेल्या संघात आयपीएल 2022 गाजवणारे रजत पाटीदार, शाहबाज अहमद असे युवा खेळाडू आहेत. तर कुलदीप यादव, ईशान किशन, श्रेयस अय्यर या सध्या संघाबाहेर असणाऱ्या स्टार खेळाडूंनाही संघात घेतलं आहे. शिखरनं याआधी वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेत संघाचं उत्तम नेतृत्व केलं होतं, त्यामुळे तो संघाचा कर्णधार असून श्रेयसवर उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर नेमका संघ कसा आहे पाहू…

कसा आहे भारतीय संघ?

शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद सिराज, दीपक चाहर.

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक:सामना तारीख ठिकाण
पहिला एकदिवसीय सामना 6 ऑक्टोबर 2022 लखनौ
दुसरा एकदिवसीय सामना 9 ऑक्टोबर 2022 रांची 
तिसरा एकदिवसीय सामना 11 ऑक्टोबर 2022 दिल्ली

हे देखील वाचा-
Source link

Check Also

Team India: श्रीलंका, न्यूझीलंड त्यानंतर ऑस्ट्रेलिया; भारताचं पुढील तीन महिन्यांचं वेळापत्रक जाहीर

<p><strong>Team India:</strong> भारतीय नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयनं भारतीय क्रिकेट संघाच्या पुढील तीन महिन्यांचं शेड्यूल जारी …

Team India Lost Odi Series Against Bangladesh After Loosing 2nd Odi First Time Lost Series Against Bangladesh After 2015

India vs Bangladesh 2022 : भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN) यांच्यात सुरु एकदिवसीय मालिकेतील …

PAK Vs ENG GUNSHOTS Heard 1 Km Near England Team Hotel In Multan Fans Say A Normal Day In Pakistan

PAK vs ENG: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यामधील तीन कसोटी सामन्यातील दुसरा सामना शुक्रवारी ( 9 …

Leave a Reply

Your email address will not be published.