IND Vs NZ, 1st ODI New Zealand Won Match By 7 Wickets Against India Eden Park Stadium

IND vs NZ, 1st ODI Highlights : भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) हा पहिला एकदिवसीय सामना न्यूझीलंडच्या ऑकलंड येथे नुकताच पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने जबरदस्त फलंदाजीचं दर्शन घडवत 307 धावांचं आव्हान केवळ 47.1 षटकांत तीन गडी गमावून पूर्ण करत भारतावर 7 विकेट्सनी विजय मिळवला आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेतही किवींनी 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आधी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय न्यूझीलंडने केला. ज्यानंतर भारताने सलामीवीर शिखर धवन-शुभमन गिल यांच्या अर्धशतकांसह श्रेयस अय्यरच्या 80 धावांच्या जोरावर 306 धावां केल्या. ज्या न्यूझीलंडने टॉम लेथमच्या नाबाद 145 आणि कर्णधार केनच्या नाबाद 94 धावांच्या जोरावर पूर्ण करत सामना जिंकला. 

सामन्यात सर्वप्रथम नाणेफेक जिंकत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारत फलंदाजीला मैदानात आला आणि सलामीवीरांनी दमदार सुरुवात केली. सलामीवीर शुभमन गिलसह कर्णधार शिखर धवन यांनी स्फोटक खेळी सुरु केली. दोघेही चांगल्या लयीत होते. दोघांनी शतकी भागिदारी पूर्ण करताच 50 धावांवर शुभमन गिल बाद झाला. ज्यानंतर काही वेळातच शिखर धवनही 72 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर भारताचे फलंदाज पटापट बाद होऊ लागले.पंत 15 सूर्यकुमार 4 धावा करुन बाद झाला. संजूने श्रेयससोबत डाव सावरला पण 36 धावा करुन संजूही बाद झाला. वॉशिंग्टन सुंदरनेही 37 धावांची तडाखेबाज खेळी केली 3 सिक्स आणि 3 फोर त्याच्या बॅटमधून आले. पण या सर्वांमध्ये श्रेयसने 76 चेंडूत 80 धावांची सर्वाधिक खेळी करत भारताची धावसंख्या 300 पार नेण्यात मोलाची कामगिरी निभावली. न्यूझीलंडकडून लॉकी आणि साऊदी यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतले असून मिल्ने याने एक विकेट घेतली.

टॉम-केन जोडीची तुफान फटकेबाजी

न्यूझीलंडचा संघ 307 धावा करण्यासाठी मैदानात उतरला. भारताला पहिलं यश लगेचच मिळालं 22 धावा करुन फिन अॅलन बाद झाला. शार्दूलनं त्याला बाद केलं. त्यानंतर कॉन्वेही 24 धावा करुन उमरान मलिकच्या चेंडूवर बाद झाला. मग केननं संघाचा डाव सावरला तेव्हात उमराननं आणखी एक विकेट घेत डॅरील मिचेलला 11 धावांवर तंबूत धाडलं. पण त्यानंतर टॉम लेथम फलंदाजीला आला आणि त्याने केनसोबत मिळून सामना 47.1 षटकातंच न्यूझीलंडला जिंकवून दिला. टॉमने 104 चेंडूत तब्बल 19 फोर आणि पाच सिक्स मारत नाबाद 145 धावा ठोकल्या. तर केननं 98 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकार ठोकत नाबाद 94 धावा केल्या. या दोघांनी एक अभेद्य भागिदारी करत सामना न्यूझीलंडला 7 गडी राखून जिंकवून दिला. तुफान फटकेबाजी केलेल्या टॉमॉला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.

हे देखील वाचा-
Source link

Check Also

Team India: श्रीलंका, न्यूझीलंड त्यानंतर ऑस्ट्रेलिया; भारताचं पुढील तीन महिन्यांचं वेळापत्रक जाहीर

<p><strong>Team India:</strong> भारतीय नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयनं भारतीय क्रिकेट संघाच्या पुढील तीन महिन्यांचं शेड्यूल जारी …

Team India Lost Odi Series Against Bangladesh After Loosing 2nd Odi First Time Lost Series Against Bangladesh After 2015

India vs Bangladesh 2022 : भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN) यांच्यात सुरु एकदिवसीय मालिकेतील …

PAK Vs ENG GUNSHOTS Heard 1 Km Near England Team Hotel In Multan Fans Say A Normal Day In Pakistan

PAK vs ENG: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यामधील तीन कसोटी सामन्यातील दुसरा सामना शुक्रवारी ( 9 …

Leave a Reply

Your email address will not be published.