In India Vs Australia 1st T20 Match Know Weather Report And Match Details

IND vs AUS, 1st T20, Weather Report : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात आजपासून टी20 मालिकेला सुरुवात होत आहे. दोन्ही संघासाठी आयसीसी टी20 विश्वचषकाआधी ही मालिका एक प्रकारे सराव सामने असणार आहेत. टी20 विश्वचषकापूर्वी होणाऱ्या या मालिकेतील आज पहिला सामना खेळवला जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. अशामध्ये सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यास संपूर्ण सामना होणार नाही किंवा सामना रद्द ही होऊ शकतो. ज्यामुळे आज सामना होणाऱ्या ठिकाणी हवामानाची स्थिती कशी आहे पाहूया…

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज सामना होणाऱ्या पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर ढगाळ वातावरण असणार आहे. वातावरणही 25 ते 27 अंश सेल्सियसमध्ये असणार असून वातावरणात 70 टक्के आर्द्रता असणार आहे. पावसाची शक्यता देखील असून 25 टक्के इतकी शक्यता असल्याने पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

मैदानाची स्थिती  

पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर 2018 पासून आतापर्यंत झालेल्या 11 सामन्यांमध्ये सातवेळा लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघानं विजय मिळवला आहे. त्यामुळे ही खेळपट्टी फलंदाजांसाठी अधिक फायदेशीर आहे. ज्यामुळे आजही नाणेफेक जिंकल्यानंतर संघ प्रथम गोलंदाजी निवडण्याची दाट शक्यता आहे. 

संभाव्य भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह. 

संभाव्य ऑस्ट्रेलिया संघ – आरोन फिंच (कर्णधार), जोस इंगलिस, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), टिम डेविड, कॅमरून ग्रीन, एडम झम्पा, पॅट कमिंस, जोस हेजलवुड, सीन एबॉट.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया Head to Head

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापंर्यंत 23 टी-20 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 13 सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, ऑस्ट्रेलियाच्या संघाला 9 सामने जिंकता आले आहेत. यातील एक सामना अनिर्णित ठरलाय. 

हे देखील वाचा- 


Source link

Check Also

IND Vs SA 3rd T20 Match Highlights South Africa Won By 49 Runs Against India Holkar Stadium Dinesh Karthik 46 Runs Off 21

IND vs SA 3rd T20:  रिले रोसो (Rilee Rossouw)- क्विंटन डी कॉकच्या (Quinton de Kock) …

Watch: Mohammed Siraj on the receiving end of Deepak Chahar’s tirade after error leads to six

Mohammed Siraj was on the receiving end of a tirade from bowler Deepak Chahar when …

IND Vs SA 3rd T20: Team India Need 228 Runs To Win Against South Africa Holkar Cricket Stadium Indore

IND vs SA 3rd T20: सलामीवीर क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) आणि रिले रोसो …

Leave a Reply

Your email address will not be published.