ICC Player Of The Month Award Womens Category Nominations Shared By ICC With Wrong Posters

ICC Player Of the Month : आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात आयसीसीने (ICC) 6 डिसेंबर रोजी पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंसाठी ‘प्लेअर ऑफ द मंथ’साठी नामांकित खेळाडू जाहीर केले होते. दरम्यान आयसीसीने आपल्या सोशल मीडियाद्वारे महिला आणि पुरुष अशा दोन्ही खेळाडूंच्या नावांसहित फोटोंची पोस्ट शेअर केली होती. पण हे पोस्टर शेअर करणं आयसीसीला एका चूकीमुळं महाग पडलं आयसीसीच्या एका चुकीमुळे नेटकऱ्यांनी त्यांना सोशल मीडियावर चांगलच ट्रोल केलं.

महिला नॉमिनीजची पोस्ट शेअर करताना आयसीसीने चुकून महिलांच्या फोटोंच्या खाली पुरुषांची नावे लिहिली होती. आयसीसीची ही मोठी चूक नेटकऱ्यांनीही लगेच पकडली. ज्यानंतर त्यांना चांगलच ट्रोल करण्यास नेटीजन्सनी सुरुवात केली. तीन महिला क्रिकेटपटूंना ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’साठी नामांकन मिळाले होते. यात पाकिस्तानची खेळाडू सिद्रा अमीन, थायलंडची नथकन चंथम आणि आयर्लंडची गॅबी ल्यूईस यांचा समावेश आहे. पण या महिला खेळाडूंच्या फोटोंटी पोस्ट शेअर करताना आयसीसीने पुरुष क्रिकेटपटूंची नावे लिहिली होती. या पोस्टरमध्ये सिद्रा अमीनच्या जागी जॉस बटलर, नट्टाकन चँथमच्या जागी आदिल रशीद आणि गॅबी लुईसच्या जागी शाहीन आफ्रिदी अशी नाव लिहिण्यात आली. आयसीसीने ही चूक कळून येत्याच पोस्ट डिलीट करुन नवी पोस्ट केली पण तोवर संबधित पोस्ट बरीच व्हायरल झाली होती.

News Reels

सिद्रा अमीननेही केलं आयसीसीला ट्रोल

महिला खेळाडूंमध्ये नामांकन मिळालेल्या पाकिस्तानच्या सिद्रा अमीननेही आयसीसीच्या या चुकीवर त्यांना ट्रोल केलं. तिने तिच्या अधिकृत ट्वीटरवरुन ट्वीट करत लिहिलं की, “मी आणि जोस बटलर जुळे आहोत हे माहित नव्हतं.” यासोबतच तिने हसणारा इमोजीही शेअर केला. या ट्विटमध्ये सिद्रा अमीनने तोच फोटो वापरला होता ज्यामध्ये आयसीसीने चूक केली होती.

हे देखील वाचा-
Source link

Check Also

PAK Vs NZ 145 Years History Of Test Cricket First Time First 2 Wicket Fell Due To Stumpings

Pakistan vs New Zealand Test : पाकिस्तान आणि न्यूझीलंड (PAK vs NZ) यांच्यात सध्या कसोटी …

AUS Vs SA Australian Player Cameron Green Sold To Mumbai Indians MI For Rs 17.50 Crore He Took 5 Wickets Haul Against South Africa

Cameron Green Fantastic Bowling : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (AUS vs SA) यांच्यात मेलबर्नमध्ये बॉक्सिंग …

Brazil Football Legend Pele Health In Critical Condition Family Shares Emotional Post

Footballer Pele Health update : ब्राझीलचे माजी महान फुटबॉलपटू पेले यांची प्रकृती सध्या नाजूक झाल्याचं …

Leave a Reply

Your email address will not be published.