Hrutha Durgule Announces Kanni On Her Birthday The Movie Will Hit The Screens Next Year

Kanni Movie : मराठमोळी अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ‘मन उडू उडू झालं’ या हृताच्या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्यानंतर हृताचे ‘अनन्या’ आणि ‘टाइमपास 3’ हे दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. ‘अनन्या’ सिनेमाच्या माध्यमातून हृताने सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. आता हृताचा लवकरच ‘कन्नी’ (Kanni) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

हृताने आज वाढदिवशी तिच्या आगामी ‘कन्नी’ सिनेमाची घोषणा केली आहे. समीर जोशीने (Sameer Joshi) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत मुख्य भूमिकेत आहेत. 2023 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

हृतानं शेअर केलं ‘कन्नी’चं पोस्टर

हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊतसह शुभंकर तावडे, ऋषी मनोहर, वल्लरी विराज ‘कन्नी’ सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. उंच आकाशात उडायचं तर हवी मैत्रीची, प्रेमाची, जिद्दीची ‘कन्नी’ असं म्हणत हृताने ‘कन्नी’ सिनेमाचं पोस्टर चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. या पोस्टवर चाहते कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत. 


दीपू आणि इंद्रा म्हणजेच हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊतची जोडी याआधी ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत दिसून आली होती. दीपू-इंद्राची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता पुन्हा एकदा ही जोडी रुपेरी पडद्यावर झळकणार असल्याने प्रेक्षक ‘कन्नी’ या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. सिनेमाच्या कलरफुल पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. 

संबंधित बातम्या

Happy Birthday Hruta Durgule : ‘दुर्वा’ ते ‘मन उडू उडू झालं’, मालिका विश्वातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी हृता दुर्गुळे!

Timepass 3 : ‘टाइमपास 3’ चा वर्ल्ड डिजिटल प्रीमिअर; 16 सप्टेंबर रोजी करण्याची ZEE5 होणार प्रदर्शित
Source link

Check Also

Brahmastra Box Office Collection 425 Crore Worldwide Gross In 25 Days Number 1 Hindi Movie Of 2022

Brahmastra Box Office Collection:  बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia …

Richa-Ali Wedding: रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी बांधली लग्नगाठ; पाहा फोटो!

Richa-Ali Wedding: रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी बांधली लग्नगाठ; पाहा फोटो! Source link

Ponniyin Selvan I Box Office Collection Day 4 Movie Cross 250 Crore

Ponniyin Selvan I:  दिग्दर्शक मणिरत्न यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ (Ponniyin Selvan) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ …

Leave a Reply

Your email address will not be published.