Hrithik Roshan And Saif Ali Khan Starre Vikram Vedha To Get Wide 100 Country Release

Vrikram Vedha : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा आगामी चित्रपट ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha) सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटातून पहिल्यांदाच हृतिक रोशन आणि सैफ अली खान एकमेकांसमोर उभे ठाकलेले दिसणार आहेत. ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट 30 सप्टेंबरला चित्रपटगृहात रिलीज आहे. मात्र, रिलीजपूर्वीच या चित्रपटाने नवा विक्रम रचला आहे. सैफ आणि हृतिकचा हा चित्रपट जगभरातील 100हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार असून, हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वात मोठी ओपनिंग मिळणारा चित्रपट ठरणार आहे.

भारताव्यतिरिक्त, उत्तर अमेरिका, यूके, मध्य पूर्व ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारख्या मोठ्या देशांमध्ये ‘विक्रम वेधा’ एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय हा चित्रपट युरोपातील 22 आणि आफ्रिकेतील 27 देशांमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे. यासह जपान, रशिया, इस्रायल, लॅटिन अमेरिका यांसारख्या देशांमध्येही ‘विक्रम वेधा’ प्रदर्शित केला जाणार आहे.

साऊथ चित्रपटाचा रिमेक

‘विक्रम वेधा’ हा याच नावाच्या साऊथ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan)आणि ऋतिक रोशन (Hrithik Roshan) हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. विक्रम वेधा चित्रपटाच्या तमिळ व्हर्जनमध्ये ‘विक्रम’ ही भूमिका आर. माधवननं साकारली होती, तर ‘वेधा’ ही भूमिका अभिनेता विजय सेतुपतीनं (Vijay Sethupathi) साकारली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता.

पुष्कर आणि गायत्री यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘विक्रम वेधा’चे पोस्टर आणि ट्रेलर या चित्रपटाबाबतचे कुतूहल वाढवणारे आहेत. पोस्टरमध्ये पहिल्यांदाच हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांना एकाच फ्रेममध्ये एकत्र पाहणं प्रेक्षकांसाठी एखाद्या मेजवानीपेक्षा कमी नाही. या चित्रपटात भरपूर अ‍ॅक्शन पाहायला मिळणार असल्याचे ट्रेलरमधून दिसते आहे.

ट्रेलरनेही रचला विक्रम!

‘विक्रम वेधा’च्या ट्रेलरला सोशल मीडियावर उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अल्पावधीतच ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. या ट्रेलरला अवघ्या पाच तासांत पाच मिलियन व्ह्यूज मिळाले होते. ‘विक्रम वेधा’ या चित्रपटात सैफ अली खान ‘विक्रम’च्या भूमिकेत दिसणार आहे. तर, हृतिक रोशन ‘वेधा’च्या भूमिकेत दिसणार आहे. हृतिक रोशन आणि सैफ अली खानचा या चित्रपटातील लूक देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Vikram Vedha : ‘विक्रम वेधा’चे जबरदस्त पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ दिवशी रिलीज होणार चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर!

Hrithik Roshan : ह्रतिकचा ‘विक्रम वेधा’ मधील लूक; फोटो पाहून सबा म्हणाली..


Source link

Check Also

Brahmastra Box Office Collection 425 Crore Worldwide Gross In 25 Days Number 1 Hindi Movie Of 2022

Brahmastra Box Office Collection:  बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia …

Richa-Ali Wedding: रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी बांधली लग्नगाठ; पाहा फोटो!

Richa-Ali Wedding: रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी बांधली लग्नगाठ; पाहा फोटो! Source link

Ponniyin Selvan I Box Office Collection Day 4 Movie Cross 250 Crore

Ponniyin Selvan I:  दिग्दर्शक मणिरत्न यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ (Ponniyin Selvan) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ …

Leave a Reply

Your email address will not be published.