Winter Body Pain : सुस्त जीवनशैली आणि हिवाळ्यात (Winter) शारीरिक हालचालींचा (Body Movement) अभाव यामुळे हृदयाच्या (Heart Disease) समस्यांपासून मानसिक आरोग्यापर्यंत (Mental Health) अनेक समस्या उद्भवू शकतात. एका जागी बसण्याच्या या सवयीमुळे तुम्हाला हळूहळू इतर आजारांचा धोका वाढू शकते. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी शारीरिक हालचाली खूप महत्त्वाच्या आहेत. थंडीमध्ये आपण अधिक सुस्त होईन जातो. अनेकांना घराबाहेर पडण्याची किंवा थंडीत व्यायाम (Exercise) करण्याची इच्छा नसते. पण हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराला हालचालीची अधिक गरज असते. या सवयीमुळे तुमची थंडीपासून सुटका होते. हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं
हिवाळ्यात अनेक जण अंगदुखी किंवा सांधेदुखीच्या तक्रारी उद्भवतात. याचं कारण म्हणजे शारीरिकदृष्ट्या तुमची हालचाल कमी झाल्यामुळे किंवा व्यायाम न केल्यामुळे, स्नायू कमकुवत होतात, परिणामी क्रॉनिक पेन सिंड्रोम होतो. हिवाळ्यात सुस्त जीवनशैलीमुळे होणारे शरीर दुखणं टाळण्यासाठी दर दोन तासांनी 5 मिनिटे चालावं. जर तुम्ही नेहमी कामामुळे बसलेले असाल तर तुम्ही थोड्या-थोड्या अंतराने हालचाल करत राहा. एका जागी बसून राहू नका.
पुरेश्या प्रमाणात पाणी प्या
हिवाळ्यामध्ये लोक पाणी कमी पितात. हे करणं शरीरासाठी हानिकारक आहे. हिवाळ्यात कोरड्या हवेमुळे निर्जलीकरण, थकवा आणि वेदना होतात. त्यामुळे दिवसभरात पुरेशा प्रमाणात पाणी पिणं महत्त्वाचं आहे. गरम चहा किंवा सूप प्यायल्यानेही शरीरातील उष्णता वाढवण्यास मदत होईल. जर तुम्ही शारीरिक हालचाली करत असाल तर दिवसभरात किमान 9 ते 10 ग्लास पाणी प्या.
सकस आणि पौष्टिक आहार घ्या
उन्हाळ्याप्रमाणेच हिवाळ्यातही आपल्या आहाराची विशेष काळजी घ्या. ताजी फळे, भाज्या, कडधान्ये यांचा आहारात समावेश करा. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल आणि तुमचं संक्रमण आणि इतर आजारांपासून संरक्षण होईल. हिवाळ्यात जंक फूड आणि तेलकट अन्न खाणे टाळा.
News Reels
सप्लिमेंट
हाडे आणि सांधेदुखी सतत होत असेल तर कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स घ्या. सप्लिमेंट्स डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या, स्वत: काहीही ठरवू नका.
Disclaimer : या लेखात नमूद केलेले दावे आम्ही फक्त सूचना आणि माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा याची पुष्टी करत नाही. कोणतेही उपचार/औषध/आहार आणि सूचना लागू करण्यापूर्वी, कृपया डॉक्टरांचा किंवा संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्या.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
Source link