Health Tips These Food Diabetic Patient Eat In Dinner Marathi News

Diabetes Diet : सध्याची व्यस्त जीवनशैली आणि खाण्याच्या अयोग्य वेळा यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. यामुळे मधुमेहासारख्या समस्या आणखी वाढतात. मधुमेह (Diabetes) ही अशी एक समस्या आहे ज्यामध्ये रक्तातील साखरेची पातळी खूप वाढते. एखाद्या व्यक्तीला मधुमेहाची लागण झाल्यास त्यातून मुक्त होणे कठीणच होते. मात्र, या दरम्यान जर तुम्ही योग्य आहार योजना केली तसेच जीवनशैलीत थोडा बदल केला तर तुम्ही या आजारावर नियंत्रण मिळवू शकता.  

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही तुमच्या आहारात फायबर, प्रोटीन, जीवनसत्त्वे यांचा नियमितपणे समावेश केला तर तुम्ही मधुमेहावर बऱ्याच अंशी नियंत्रण ठेवू शकता. मधुमेहामध्ये तुम्हाला कमी प्रमाणात कर्बोदकांचे सेवन करावे लागते. तुम्ही नाश्ता आणि दुपारच्या जेवणात काही कार्ब्स घेऊ शकता. जर तुम्ही रात्रीच्या जेवणात कार्ब्स घेणे सुरू केले तर त्यामुळे साखरेची पातळी वाढू शकते. डायबिटीजच्या रुग्णांनी रात्रीच्या जेवणात फायबरचे प्रमाण जास्त घेतले पाहिजे. त्यामुळे पोट बराच काळ भरलेले राहते. त्याचबरोबर शरीरातील साखरेचे प्रमाणही कमी होते. मधुमेहामध्ये रात्रीचे जेवण काय असावे? हे जाणून घ्या.

मधुमेहामध्ये रात्रीचे जेवण काय असावे?

कमी सोडियमचे अन्न : साधारणपणे मधुमेहामध्ये, तुम्ही रात्रीच्या जेवणात कमी सोडियमचे अन्न खाऊ शकता. मधुमेहाच्या रुग्णांनी रात्रीच्या जेवणात सोडियम म्हणजेच मीठ कमी घ्यावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दिवसा तुम्ही जास्त सोडियम घेऊ शकता, ते तुमच्या शरीरातील सोडियमची पातळी राखते. 

कमी प्रमाणात अन्न खा : डायबिटीजच्या रुग्णांनी रात्रीच्या जेवणात थोडेसेच अन्न खावे. विशेषत: आपल्या खाण्याच्या भागाकडे लक्ष द्या. ताटात हिरव्या भाज्यांचा अधिक समावेश करा. त्याच वेळी, रोटीचे प्रमाण कमी करा. 

रात्रीच्या जेवणासाठी काय खाणे योग्य? 

तुम्ही तुमच्या जेवणात अंडी, फळे आणि दुग्धजन्य पदार्थ, बीन्स, पालक आणि ब्रोकोली, साल्सा, मशरूम, ग्रील्ड चिकन, ओटमील, टोफू यांसारख्या पदार्थांचा समावेश करू शकता. हे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. 

महत्वाच्या बातम्या : 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator


Source link

Check Also

Benefits Of Walnuts Good For Heart And Diabetes Marathi News

Benefits Of Walnuts : अनेकदा बाहेरच्या खाण्यापिण्यामुळे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजार होतात. यामुळे कोलेस्ट्रॉल वाढणे, …

Benefits Of Raisins : भिजवलेल्या मनुक्याचे अनेक गुणकारी फायदे

Benefits Of Raisins : भिजवलेल्या मनुक्याचे अनेक गुणकारी फायदे Source link

Hair Care Tips How To Increase Hair Volume Naturally Marathi News

Hair Care Tips : स्त्री असो किंवा पुरुष प्रत्येकालाच आपले केस (Hair) प्रिय असतात. केस …

Leave a Reply

Your email address will not be published.